मितालीने टाकले ‘विराट-रोहित’ला मागे

भारतीय महिला संघाची सर्वात अनुभवी खेळाडू असलेल्या मिताली राजने सध्या सुरु असलेल्या टी-20 महिला विश्‍वचषक स्पर्धेत लागोपाठ दोन अर्धशतक झळकवताना भारताकडून सर्वाधिका धावा करणाऱ्या खेळाडोपोचा मान मिळवला आहे. महिला क्रिकेट टीम मधील सचिन तेंडूलकर म्हणुन ओळख असलेल्या मितालीने टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 2283 धावा केल्या आहेत. तर, पुरुष संघातील सलामीवीर रोहित शर्माच्या खात्यात 2207 धावा आहेत.

मिताली राजने महिला विश्‍वचषक टी-20मध्ये पाकिस्तानविरुद्ध 56 धावांची खेळी करताच रोहितला मागे टाकत भारता कडून टी-20 मध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूचा मान मिळवला होता. त्यानंतर तिने आयर्लंड विरुद्धच्या सामन्यातही 51 धावांची खेळी केली. महिला क्रिकेटचा विचार केला तर सर्वाधिक धावांच्या बाबतीत मिताली जगात चौथ्या क्रमांकावर आहे. यात पहिल्या स्थानावर न्यूझीलंडची सूजी बेट्‌स (2996) , वेस्ट इंडिजची स्टेफनी टेलर (2691) दुसऱ्या स्थानी आणि इंग्लंडची एडवर्ड (2605) तिसऱ्या स्थानी आहे.

-Ads-

भारताकडून आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेट मध्ये (महिला आणि पुरुष) सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये मिताली पहिल्या, रोहित दुसऱ्या विराट कोहली हा तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्यानं 58 डावांमध्ये 2102 धावा केल्या आहेत. त्यानंतर महिला संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरचा क्रमांक लागतो. पाचव्या स्थानी सुरेश रैना, तर सहाव्या स्थानी महेंद्रसिंग धोनी हे खेळाडू आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)