चेन्नई – भारत आणि वेस्ट इंडीज दरम्यान सुरु असलेल्या तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील अखेरच्या सामन्यास थोड्याच वेळात चेन्नईतील एम ए चिदंबरम स्टेडियम सुरूवात होणार आहे. भारताने हि मालिका या पुर्वीच 2-0 अश्या फरकाने जिंकली असून आजच्या सामन्यात विंडीजचा पराभाव करुन व्हाईट वॉश देण्याची भारतीय संघाकडे संधी असून आजच्या सामन्यात भारतीय संघ आपली बेंच स्ट्रेंथ तपासण्याची शक्यता आहे.
तत्पूर्वी झालेल्या नाणेफेकीचा कौल वेस्ट इंडीजच्या बाजूने लागला असून वेस्ट इंडीज संघाने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. भारतीय संघाने संघात बदल केला असून उमेश यादव, जसप्रीत बुमराह आणि कुलदीप यादव यांना विश्रांती दिली आहे. आजच्या सामन्यात युज़वेंद्र चहल आणि वाॅशिंग्टन सुंदर या गोलंदाजाला संधी देण्यात आली आहे.
Windies have won the toss and will bat first in the final T20I at Chennai.#INDvWI pic.twitter.com/kMsvdJzKC4
— BCCI (@BCCI) November 11, 2018
भारत संघ पुढीलप्रमाणे :
रोहित शर्मा, शिखर धवन, ऋषभ पंत, लोकेश राहुल, मनीष पांडे, दिनेश कार्तिक, क्रुणाल पांड्या, युज़वेंद्र चहल, वॉशिंग्टन सुंदर, खलील अहमद, भुवनेश्वर कुमार
वेस्ट इंडीज संघ पुढीलप्रमाणे :
शाइ होप, शिमरोन हेट्मेयर, डैरेन ब्रावो, दिनेश रामदिन, निकोलस पुरन, काइरोन पोलार्ड, कार्लोस ब्रेथवेट, फैबियन एलन, कीमो पॉल, ख्यारी पिएरे, ओशन थॉमस
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा