भारताकडे विंडीजला व्हाईट वॉश देण्याची संधी

भारत विरुद्ध वेस्ट इंडीज टी-20 मालिका

चेन्नई – भारत आणि वेस्ट इंडीज दरम्यान सुरु असलेल्या तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील अखेरचा सामना आज चेन्नई येथे होणार असून भारताने हि मालीका या पुर्वीच 2-0 अश्‍या फरकाने जिंकली असून आजच्या सामन्यात विंडीजचा पराभाव करुन व्हाईट वॉश देण्याची भारतीय संघाकडे संधी असून आजच्या सामन्यात भारतीय संघ आपली बेंच स्ट्रेंथ तपासण्याची शक्‍यता आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

विंडीजचा संघ गेल्या दोन महिण्यापासून भारतात कसोटी, एकदिवसीय आणि टी-20 मालिकेसाठी आलेला असून या तिन्ही मालिका विंडीजने एकतर्फी गमावताना संपुर्ण मालिकेत विंडीजच्या संघाला केवल एकच विजय मिलवता आला असून आपल्या या दौऱ्याचा शेवट विजयाने करण्याची संधी विंडीज कडे या सामन्यात आहे. कारण या सामन्यात भारतीय संघाची घोसणा दोन दिवसांपुर्वीच केली गेली असून संघात चायनामन गोलंदज कुलदीप यादव, जसप्रीत बुमराहयांना विश्रांती देण्याचा निर्णय संघ व्यवस्थापनाने घेतला आहे. त्यामुळे विंडीजकडे हा सामना जिंकण्याची संधी आहे.

दुसरीकडे भारतीय संघ या सामन्यात श्रेयस अय्यर, वॉशिंग्टन सुंदर, सिद्धार्थ कौल आणि शहाबाद नदिमयांना संधी देण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे सामन्यात भारतीय संघ आपल्या दुसऱ्या फळीतील खेळाडूंना तपासण्याची शक्‍यता आहे.
विंडीज विरुद्धच्या मालिके नंतर भारतीय संघ लागलीच ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. त्यामुळे त्या दौऱ्यावर जाण्यापूर्वी संघातील प्रमुख खेळाडूंना पुरेशी विश्रांती मिळावी तसेच गरज पडल्यास दुसऱ्या फळीतील खेळाडूंची चाचपणी ही व्हावी या उद्देशाने भारतीय संघात या खेळाडूंचा समावेश केला जाण्याची शक्‍यता आहे.

चेपॉक मैदानावरील खेळपट्टी ही संथ असून या सामन्यात ती फलंदाजांसाठी पोषक असणार आहे. त्याचा फायदा निश्‍चीतच भारतीय संघ घेताना दिसुन येइल. कारण विंडीज विरुद्धच्या एकदिवसीय आणि टी-20 मालिकेत भारतीय संघाचे फलंदाज चमकदार कामगिरी करत असून संघाचा कर्णधार रोहित शर्माने दुसऱ्या टी-20 सामन्यात नाबाद 111 धावांची खेळी केली होती. तर, भारताचा दुसरा सलामीवीर शिखर धवन देखिल पुन्हा लईत येण्याची शक्‍यता या सामन्यात असणार आहे. त्यातच मधल्या फळीतील फलंदाज लोकेश राहुल आणि ऋषभ पंतयांना आपल्या कामगिरीत सुधारणा करण्याची अखेरची संधी या सामन्यात असणार आहे. तर, दिनेश कार्तिकला पहिल्या सामन्यातील कामगिरीची पुनरावृत्ती करताना मधल्याफळीतील जबाबदारी समर्थपणे पाडावी लागणार आहे.

तर, दुसरीकडे कसोटी मालिकेत एकतर्फी पराभव स्विकारावा लागल्यानंतर एकदिवसीय मालिकेत विंडीजच्या फलंदाजांनी जोरदार पुनरागमन करताना पहिल्या सामन्यात भारतीय गोलंदाजांची यथेच्छ धुलाई करताना एका सामन्यात विजय मिळवला होता. तर, एका सामन्यात बरोबरी साधली होती.

मात्र, तिसऱ्या सामन्यानंतर पुन्हा भारतीय संघाने मालिकेत पुनरागमन करत विंडीजच्या फलंदाजांना पिछाडीवर पाडले होते. तसेच टी-20 सामन्यांच्या मालिकेतही भारतीय संघाने विंडीजच्या फलंदाजांना 130 धावांच्या आत रोखताना चमकदार कामगिरीची नोंद केली होती. विंडीजला जर मालिकेचा शेवट गोड करायचा असेल तर त्यांच्या फलंदाजांना चांगली कामगिरी करतानाच त्यांच्या गोलंदाजांसमोर भारतीय फलंदाजांना रोखण्याचे आव्हान असणार आहे.

प्रतिस्पर्धी संघ –

भारतीय संघ : रोहित शर्मा (कर्णधार), शिखर धवन, लोकेश राहुल, दिनेश कार्तिक, मनीष पांडे, श्रेयस अय्यर, रिषभ पंत, कृणाल पंड्या, वॉशिंग्टन सुंदर, युझवेंद्र चहल, भुवनेश्वरकुमार, खलील अहमद, शाहबाझ नदीम, सिद्धार्थ कौल.

वेस्ट इंडीज : कार्लोस ब्रेथवेट (कर्णधार), डॅरेन ब्राव्हो, शिमरॉन हेतमायर, शाई होप, ओबेद मेकॉय, किमो पॉल, खॅरी पिएर्रे, कायरन पोलार्ड, निकोलस पूरन, रोव्ह्मन पॉवेल, दिनेश रामदिन, शेरफाने रुदरफोर्ड, ओश्‍ने थॉमस.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)