भारत ‘अ’ 8 बाद 467 वर डाव घोषीत; न्यूझीलंड ‘अ’ ची दमदार सुरुवात

माऊंट मॉंगमाय (न्यूझीलंड) – अनुभवी पार्थीव पटेलच्या दमदार 94 धावांच्या जोरावर भारत अ संघाने आपला डाव 8 बाद 467 धावांवर घोषित केला. त्यानंतर भारतीय गोलंदाजांनी निष्प्रभ मारा केल्याने प्रत्युत्तरतात फलंदाजीस उतरलेल्या न्यूझीलंड संघाने 1 गडी गमावत 176 धावा करून भारताला चोख प्रतिउत्तर दिले आहे.

भारत अ विरुद्ध न्यूझीलंड अ संघात सुरु असलेल्या पण अधिकृत नसलेल्या कसोटी सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. त्याला भारतीय फलंदाजांनी सार्थ ठरवला. तळाच्या फलंदाजांच्या उपयुक्त खेळींच्या बळावर भारताने 8 गाड्यांच्या मोबदल्यात 467 धावांपर्यंत मजल मारली होती. न्यूझीलंडसाठी मध्यमगती जलद गती गोलंदाज ब्लेअर टिकनर याने 80 धावा देत सर्वाधिक चार गडी बाद केले.

त्यानंतर फलंदाजीस आलेल्या न्यूझीलंड संघाची सुरुवात देखील जबरदस्त झाली. दुसर्या दिवसाच्या अखेरपर्यंत त्यांनी 1 गडी गमावत 176 धावा केल्या होत्या. न्यूझीलंडचे माजी कर्णधार रुदरफोर्ड यांचा मुलगा हमीष रुदरफोर्ड याचे शानदार शतक आणि दुसरा सलामीवीर विल यंग यांनी दिलेली 121 धावांची सलामी त्यांच्या डावाचे वैशिष्ट्‌य ठरले. विल 49 धावांवर बाद झाला तर हमीष रुदरफोर्डने 18 चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर 169 चेंडूत 106 धावा करून नाबाद आहे.

न्यूझीलंडचा एकमेव बळी कृष्णप्पा गौथम याने मिळवला. विल ला अपले 28वे प्रथम श्रेणी अर्धशतक पुर्ण करन्यास 1 धाव कमी पडली. दुसर्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा हमीष रुदरफोर्ड नाबाद 106 धावा अणि सिफऱ्ट 13 धावांवर खेळत होते. महंमद सिराजने विरोधी संघाला थोडे अडचणीत आणले पण तो त्यांना बाद करण्यात अपयशी ठरला. तर मध्यमगती गोलंदाज दीपक चाहर आज काही कमाल करू शकला नाही.

तत्पूर्वी, पार्थीव पटेल (94) याला शतकाने हुलकावणी दिली. त्यानंत आलेल्या फलंदाजांनी धावांचा ओघ कमी होऊ दिला नाही. विजय शंकरने 96 चेंडूत 62 धावा तर कृष्णप्पा गौथम याने उपयुक्त 47 धावांची खेळी करत भारताची धावसंख्या 467 पर्यंत नेली.

पहिल्या दिवशी नवोदीत पृथ्वी शॉ, हनुमा विहारी, मयांक अगरवाल यांनी अर्धशतकी खेळ्या केल्या. पृथ्वी शॉ याने 88 चेंडुत तडफदार 62 धावांची खेळी केली. हनुमा विहारी याने 150 चेंडुत 86 धावांची संयमी खेळी केली. त्याला मयंक अगरवाल याने 65 धावा करत उत्तम साथ दिली. सऱ्व फलंदाज धावा करत असताना अनुभवी कर्णधार अजिंक्‍य रहाणे(12) आणि मुरली विजय(28) यांना चांगली कामगिरी करण्यात अपयश आले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)