गोल्डफिल्ड डॉल्फिन्स संघाला विजेतेपद

इंडोशॉटले पीवायसी प्रिमियर लीग क्रिकेट स्पर्धा  

पुणे – पीवायसी हिंदू जिमखाना यांच्या वतीने आयोजित इंडोशॉटले पीवायसी प्रिमियर लीग क्रिकेट स्पर्धेत अंतिम फेरीत गोल्डफिल्ड डॉल्फिन्स संघाने ओव्हन फ्रेश टस्कर्स संघाचा 6गडी राखून पराभव करत विजेतेपद संपादन केले.
पीवायसी हिंदू जिमखाना येथे पार पडलेल्या या स्पर्धेत अंतिम फेरीच्या लढतीत गोल्डफिल्ड डॉल्फिन्स संघाच्या शिस्तबद्ध गोलंदाजीपुढे ओव्हन फ्रेश टस्कर्स संघाला 6 षटकांत 3 बाद 40 धावांपर्यंतच मजल मारता आली. यात श्रीनिवास चाफळकरने 14 चेंडूत 21 धावा व शिरीष आपटेने 10 चेंडूत 9 धावा करून संघाच्या डावाला आकार दिला.

-Ads-

तर, गोल्डफिल्ड डॉल्फिन्सकडून रोहन छाजेड 1-4, अश्विन शाह 1-5, विश्वेश कुंभोजकर 1-7 यांनी भेदक गोलंदाजी करुण संघाच्या विजयाचा पाया रचला. 40 धावांचे आव्हान गोल्डफिल्ड डॉल्फिन्स संघाने 5.2 षटकांत 1 बाद 41 धावा करून पूर्ण केले. यात रोहन छाजेडने सयंमपूर्ण फलंदाजी करत 23 चेंडूत 1 चौकाराच्या मदतीने नाबाद 24 धावा करून संघाला विजय मिळवून दिला. रोहनला अश्विन शाहने 9 धावा करून सुरेख साथ दिली. अंतिम सामन्याचा मानकरी रोहन छाजेड ठरला.

याआधीच्या उपांत्य फेरीच्या लढतीत हर्षल गंद्रे नाबाद 50 धावांच्या खेळीच्या जोरावर ओव्हन फ्रेश टस्कर्स संघाने एनएच वुल्वस संघावर 43 धावांनी विजय मिळवत अंतिम फेरी गाठली. रोहन छाजेड नाबाद 41 धावा व 1-5 याने केलेल्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर गोल्डफिल्ड डॉल्फिन्स संघाने आर्यन स्कायलार्कसचा 58 धावांनी पराभव करत अंतिम फेरीत धडक मारली.

स्पर्धेतील विजेत्या गोल्डफिल्ड डॉल्फिन्स संघाला ज्ञानेश्वर आगाशे मेमोरियल करंडक अशी पारितोषिके देण्यात आली. स्पर्धेचे पारितोषिक वितरण इंडो शॉटलेचे अनिल जालिहाल, अजित खेर आणि पीवायसी हिंदू जिमखानाचे अध्यक्ष डॉ. सुधीर भाटे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी रेखा आगाशे, पीवायसी हिंदू जिमखानाचे मानद सचिव आनंद परांजपे, क्‍लबच्या क्रिकेट विभागाचे सचिव विनायक द्रविड, ब्रिहंसचे मंदार आगाशे, होडेकचे अभिजीत खानविलकर, कारा इंटलेक्‍टचे रणजीत पांडे, अभिषेक ताम्हाणे, सारंग लागू, कपिल खरे, तुषार नगरकर, देवेंद्र चितळे, निखिल शहा, शिरीष गांधी आदी मान्यवर उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)