रायुडूवर सदोष गोलंदाजी शैलीचा ठपका

दुबई – मधल्या फळीतील भारतीय फलंदाज आणि कामचलाऊ गोलंदाज अंबाती रायुडू याने भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिल्या एकदिवसीय सामन्यात दोन षटके गोलंदाजी केली होती. त्याची गोलंदाजी शैली सदोष असल्याचे सामनाअधिकाऱ्याने सांगितले असून त्यामुळे आयसीसी त्याच्या गोलंदाजी शैलीची तपासणी करणार असल्याची माहिती आयसीसीसीने एका स्टेटमेन्टद्वारे दिली आहे.

स्टेटमेन्टमध्ये आयसीसीने लिहले आहे की, सामना अधिकाऱ्याने मॅच रिपोर्ट दिला असून त्यात अंबाती रायुडू या 33 वर्षीय फिरकी गोलदांजीची शैली सदोष आढळली आहे. याबाबत आम्ही भारतीय संघ व्यवस्थापनाला कळवले असून त्याच्या शैलीची तपासणी येत्या 14 दिवसात होणे गरजेचे आहे.

परंतु, जोपर्यंत त्याच्या गोलंदाजीवर निर्णय होत नाही तोपर्यत 14 दिवसात त्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर गोलंदाज करण्याचे परवानगी आहे. रायुडूने 46 एकदिवसीय सामन्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत फक्त 20.1 षटके गोलंदाजी केली आहे. त्यात त्याने तीन बळी मिळवले आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)