हनीवेल, त्रिशा एंटरप्रायझेसची विजयी सलामी

एन्ड्युरन्स प्रिमिअर कॉर्पोरेट लीग क्रिकेट 2019 स्पर्धा

पुणे  – ई2डी स्पोर्टस तर्फे आयोजित एन्ड्युरन्स प्रिमिअर कॉर्पोरेट लीग क्रिकेट 2019 स्पर्धेत साखळी फेरीत हनीवेल, त्रिशा एंटरप्रायझेस या संघांनी अनुक्रमे इक्‍यु टेक्‍नॉलॉजीक व बीएमएफ या संघांचा पराभव करून विजयी सलामी दिली. लवळे येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत ब गटातील पहिल्या सामन्यात सुशान मुदलेर (नाबाद 101धावा) याने केलेल्या शतकी खेळीच्या जोरावर हनीवेल संघाने इक्‍यु टेक्‍नॉलॉजीक संघाचा 8 गडी राखून पराभव करत शानदार सुरुवात केली.

प्रथम फलंदाजी करताना जुनेद सय्यद (नाबाद 27), अमर गजभीये (23), रोहन पाटील (20) यांनी केलेल्या धावांच्या जोरावर इक्‍यु टेक्‍नॉलॉजीक संघाने 20 षटकांत 8बाद 127 धावा केल्या. हनीवेलकडून प्रमोद बारावकर(3-8), मछिंद्र शेगर(2-34) यांनी केलेल्या अफलातून गोलंदाजीच्या जोरावर इक्‍यु टेक्‍नॉलॉजीक संघाला 127 धावांवर रोखले. हे आव्हान हनीवेल संघाने 11.5 षटकांत 2 बाद 131 धावा करून विजयावर शिक्‍कामोर्तब केला. यात सुशान मुदलेरने 50 चेंडूत 9 चौकार व 8 षटकारांच्या मदतीने आक्रमक नाबाद 101 धावांची शतकी खेळी करून संघाला एकहाती विजय मिळवून दिला.

दुसऱ्या सामन्यात क गटात सौरभ सिंग (नाबाद 28 धावा व 3-17) याने केलेल्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर त्रिशा एंटरप्रायझेस संघाने बीएमएफचा 5 गडी राखून पराभव करत विजयी सलामी दिली. स्पर्धेचे उद्‌घाटन ई2डी स्पोर्टसचे कुमार ठक्कर, स्वप्निल चिखले आणि निलेश एकतपुरे यांच्या हस्ते करण्यात आले.

स्पर्धेचा सविस्तर निकाल : गटसाखळी फेरी :

पूल ब: इक्‍यु टेक्‍नॉलॉजीक: 20 षटकात 8बाद 127धावा(जुनेद सय्यद नाबाद 27(15), अमर गजभीये 23(25), रोहन पाटील 20(29), प्रमोद बारावकर 3-8, मछिंद्र शेगर 2-34)पराभूत वि.हनीवेल: 11.5षटकात 2 बाद 131धावा(सुशान मुदलेर नाबाद 101(50), ज्ञानेश्वर राठोड 1-13);सामनावीर-सुशान मुदलेर;

पूल क: बीएमएफ: 15.1षटकात सर्वबाद 80धावा(अमित उंबरीकर 27(36), प्रसाद हिराळकर 11(11), महेश भट 10, सौरभ सिंग 3-17, नवनाथ साठे 2-18, रुपेश काळे 2-20)पराभूत वि.त्रिशा एंटरप्रायझेस: 15.3षटकात 5बाद 81धावा(संतोष पडवळ 30(26), सौरभ सिंग नाबाद 28(45), महेश भट 3-7, गिरीश ओक 2-21);सामनावीर-सौरभ सिंग.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)