#INDvAUS : कोटला मैदानावर भारताचे पारडे जड

नवी दिल्ली – ऑस्ट्रेलियाच्या संघाने चौथ्या एकदिवसीय सामन्यात रेकॉर्ड ब्रेक कामगिरी करताना पाच सामन्यांच्या मालिकेत 2-2 अशी बरोबरी साधली. त्यामुळे नवी दिल्लीतील फिरोजशाह कोटला येथे होणाऱ्या पाचव्या एकदिवसीय सामन्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

जवळपास दहा वर्षांनंतर भारत आणि ऑस्ट्रेलिया हे संघ फिरोजशाह कोटला या मैदानावर एकदिवसीय सामन्यासाठी समोरासमोर येणार आहेत. या मैदानवरील खेळपट्टीही संथ असून सामन्यात नाणेफेकीचा कौल महत्त्वपूर्ण ठरणार आहे. ऑक्‍टोबर 2009 मध्ये दोन्ही संघांमध्ये शेवटचा सामना या मैदानावर झाला होता. फिरोजशाह कोटलावर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यादरम्यान चार एकदिवसीय सामने झाले आहेत आणि त्यात भारताचे पारडे जड आहे. भारताने चारपैकी तीन सामन्यांत विजय मिळवला आहे. 2 ऑक्‍टोबर 1986 मध्ये दोन्ही संघांदरम्यान येथे पहिला सामना झाला होता त्यात भारताने तीन गडी राखून विजय मिळवला होता. त्यानंतर 1987 मध्ये भारताने 56 धावांनी विजय मिळवला. तर, 1998 मध्ये ऑस्ट्रेलियाने 4 गडी राखून विजय मिळवला होता. पण, 2009 मध्ये भारताने पुन्हा 6 गडी राखून विजय मिळवला होता.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
2 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)