खुली बुद्धिबळ स्पर्धा 26 जानेवारी पासून

पुणे – विनायक नवयुग मित्र मंडळ ट्रस्ट, हिंद शक्ती सोशल फाऊंडेशन आणि जयंत गोखले चेस इन्स्टिट्यूट तर्फे प्रल्हाद सावंत यांच्या स्मृतीप्रित्यर्थ 10 व्या खुल्या बुद्धिबळ स्पधेर्चे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा भांडारकर रस्त्यावरील विनायक नवयुग मित्र मंडळ येथे शनिवार, दिनांक 26 जानेवारी रोजी होणार आहे, अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष सुनील पांडे यांनी दिली.

स्पर्धेला सकाळी 10 वाजता सुरुवात होणार आहे. ही स्पर्धा सर्वांसाठी खुली असून स्पर्धेत सहभागी घेण्यासाठी 9011013055 या क्रमांकावर संपर्क साधता येईल. सुनील पांडे म्हणाले, स्पर्धेचे उद्घाटन शनिवार, दिनांक 26 जानेवारी रोजी सकाळी 9 वाजता होणार आहे. ही स्पर्धा स्वीस पद्धतीने होणार असून, एकूण 8 फे-यांमध्ये होईल. स्पधेर्चे पारितोषिक वितरण सायंकाळी 6 वाजता होणार आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

प्रत्येक गटातील 1 ते 10 क्रमांकाना पारितोषिक देण्यात येणार असून 8 वषार्खालील, 12 वषार्खालील, 16 वषार्खालील गटात ही पारितोषिके देण्यात येणार आहे. तसेच महिला व ज्येष्ठ नागरीक यांना विशेष पारितोषिक देण्यात येणार आहे. स्पर्धेतील विजेत्यांना एकूण 20 हजार रुपयांची पारितोषिके दिली जाणार आहेत. स्पर्धेत सहभाग घेण्यासाठी नाव नोंदणी आवश्‍यक असून भांडारकर रोड येथील साने डेअरीजवळील नागेश्वर लॉन्ड्री येथे प्रवेशअर्ज उपलब्ध आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)