अनिकेत, मोहसीन यांची उपांत्य फेरीत धडक

राज्य अजिंक्‍यपद बॉक्‍सिंग स्पर्धा

पुणे – पुण्याच्या अनिकेत खोमणे, मोहसीन सय्यद आणि आकाश गोरखा यांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यावर मात करून पुणे जिल्हा परिषदेचे सदस्य व बारामती अग्रो कंपनीचे कार्यकारी संचालक रोहित पवार आणि पुणे शहर बॉक्‍सिंग असोसिएसन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित माजी कृषीमंत्री पद्मविभूषण शरदचंद्रजी पवार यांच्या वाढदिवसानिमित्त होणा-या 19 वर्षांखालील गटाच्या सृजन करंडक राज्य अजिंक्‍यपद बॉक्‍सिंग स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

भवानी पेठेतील जनरल अरुणकुमार वैद्य स्टेडियम येथे ही स्पर्धा सुरू आहे. स्पर्धेतील 52 किलो मुलांच्या गटातील उपांत्यपूर्व फेरीत पुणे जिल्ह्याच्या अनिकेत खोमणेने सांगली जिल्ह्याच्या दीप कांबळेवर 3-0ने मात केली. याच गटात पुणे शहरच्या मोहसीन सय्यदने अकोला शहरच्या प्रतीक शिंदेवर विजय मिळवून उपांत्य फेरीतील प्रवेश निश्‍चित केला.

स्पर्धेतील 56 किलो गटात पुणे शहरच्या आकाश गोरखाने क्रीडापीठाच्या प्रणय राऊतवर 3-0ने मात करून आगेकूच केली. स्पर्धेतील 54 किलो मुलींच्या गटात पुणे शहरच्या आर्या कुलकर्णीने पुणे जिल्ह्याच्या तेजल पवारवर मात करून आगेकूच केली. यानंतर 60 किलो मुलींच्या गटात पुणे शहरच्या ऋतुजा काळेने मुंबई जिल्हाच्या मरी यादववर वर्चस्व राखले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)