ऑस्ट्रेलियाचा दौरा हा भारतीय गोलंदाजांसाठी परीक्षा पहाणारा असेल – नेहरा

नवी दिल्ली – भारतीय संघ सध्या ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर असून येत्या येत्या 21 नोव्हेंबररोजी भारतीय संघ आपला पहिला टी-20 सामना खेळणार आहे. यावेळी भारतीय संघाचा मजी वेगवान गोलंदाज आशिष नेहरायाने भारतीय गोलंदाजांसाठी ऑस्ट्रेलियाचा दौरा हा सोपा दौरा नसून भारतीय संघाच्या गोलंदाजांसाठी हा दौरा परिक्षा पहाणारा ठरणार असल्याचेही त्याने यावेळी सांगितले आहे.

2003-04 मध्ये ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेलेल्या भारतीय संघाचा नेहरा देखिल सदस्य होता. या मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली होती. भारतीय संघामध्ये सध्या गुणवान वेगवान गोलंदाजांची फौज असून बुमराह, भुवनेश्‍वर आणि इशांत हे तीन वेगवान गोलंदाज भारतीय संघाला कसोटी मालिकेत विजय मिळवून देण्याची क्षमता ठेवतात असेही त्याने यावेळी सांगितले.
गत इंग्लंड, दक्षिण आफ्रिके दौऱ्यात जी परिस्थिती भारतीय वेगवान गोलंदाजांच्या वाट्याला आली होती, त्यापेक्षा संपुर्ण वेगळी परिस्थीती ऑस्ट्रेलियात असेल. त्यामुळे भारतीय संघासाठी ते वातावरण थोडे आव्हानात्मक असेल.

मात्र, सध्या यजमान ऑस्ट्रेलिया संघात स्मिथ आणि वॉर्नर या खेळाडूंचा समावेश नसल्याने भारतीय संघाला या मालिकेत विजयाची संधी असणार आहे. मात्र, तेथील वातावरण, खेळपट्ट्या या आव्हान देणाऱ्या असतील. सध्या तेथिल खेळपट्ट्या या पाटा असतील त्यामुळे त्या खेळपट्ट्यआ वेगवान गोलंदाजांसोबतच फलंदाजांना साथ देणाऱ्या असतील असेही त्याने यावेळी सांगितले.

त्याच बरोबर पुढे बोलताना तो म्हणाला की, भारतीय संघासाठी ऑस्ट्रेलियाचा दौरा हा आव्हानात्मक असला तरी मोठा दौरा आहे. या दौऱ्यात भारतीय संघ तीन टी-20, चार कसोटी सामने आणि तीन एकदिवसीय सामने खेळणार आहे. त्यामुळे हा खुप मोठा दौरा असणार आहे. त्यात जर गोलंदाजांना आपल्या कामगिरीत सातत्य राखायचे असेल तर आपल्या फिटनेसवरही त्यांना तितकेच लक्ष द्यावे लागणार आहे. असेही त्याने यावेळी नमूद केले.

यावेळी बोलताना नेहरा पुढे म्हणाला की, ऑस्ट्रेलियातील खेळपट्ट्या ठणठणीत असतात, अशा खेळपट्ट्यांवर मारा करताना गोलंदाजांचा फिटनेसही चोख हवा, कारण गोलंदाजांना अश्‍या खेळपट्टीवर वेगाने चेंडू टाकावा लागतो. त्यामुळे त्याच्या फिटनेसचा या ठिकाणी कस लागतो.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)