व्हेरीटास, कॅपजेमिनी संघांची आगेकूच

अंकुर जोगळेकर मेमोरियल आंतर आयटी क्रिकेट स्पर्धा

पुणे – व्हेरीटास संघाने ऍटॉस्‌ संघाचा तर कॅपजेमिनी संघाने बीएमसी सॉफ्टवेअर संघाचा पराभव करताना येथे सुरू असलेल्या आयडीयाज्‌ अ सास कंपनी यांच्या तर्फे स्वर्गीय अंकुर जोगळेकर यांच्या स्मरणार्थ आयोजित 15व्या अंकुर जोगळेकर मेमोरियल आंतर आयटी क्रिकेट 2018-19 स्पर्धेत आपली आगेकूच कायम ठेवली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

व्हिजन क्रिकेट अकादमी मौदानावर झालेल्या सामन्यात अमृत अलोकच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर व्हेरीटास संघाने ऍटॉस संघाचा 1 गडी राखून पराभव केला. पहिल्यांदा खेळताना व्हेरीटास संघाने ऍटॉस्‌ संघाला 20 षटकांत 7 बाद 123 धावांत रोखले. 123 धावांचे लक्ष देव रॉबीन चौधरीच्या 25 व अमृत अलोकच्या 36 धावांसह व्हेरीटास संघाने 18.4 षटकांत 9 गड्यांच्या मोबदल्यात 127 धावा करून पुर्ण करत विजय मिळवला. यावेळी अमृत अलोक सामनावीर ठरला.

तर, अन्य सामन्यात विक्रांत बांगेरच्या आक्रमक फलंदाजीच्या बळावर कॅपजेमिनी संघाने बीएमसी सॉफ्टवेअर संघाचा 73 धावांनी दणदणीत पराभव केला. पहिल्यांदा खेळताना कॅपजेमिनी संघाने 20 षटकांत 4 बाद 204 धावांचा डोंगर रचला. गिरिष बोराने 61 चेंडूत 72 धावा व विक्रांत बांगेरने 39 चेंडूत 75 धावा करून संघाचा डाव बळकट केला. 204 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना बीएमसी सॉफ्टवेअर संघ 20 षटकांत 4 बाद 133 धावांत गारद झाला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)