ऑस्ट्रेलियन ओपनमधील नवीन बदलांसाठी सज्ज- फेडरर

पर्थ – वर्षातील पहिली ग्रॅंडस्लॅम स्पर्धा ऑस्ट्रेलियन ओपनच्या टायब्रेकर गुण पद्धतीत बदल केले जाणार आहेत. हे बदल 14 जानेवारीपासून होणाऱ्या ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये लागू केले जाणार आहेत. या नवीन बदलांना रॉजर फेडरर आणि अँजेलिना कार्बर यांनी साकारात्मदृष्टीने घेतले आहे.

ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये टाय ब्रेकरचे नियम बदलल्यामुळे सर्वच ग्रॅंडस्लॅम स्पर्धांचे टायब्रेकर संबंधी नियम वेगवेगळे झाले आहेत. या स्पर्धेत जर निर्णायक सेटमध्ये गुणसंख्या 6-6 अशी झाली तर पारंपरिक पूर्ण सेट न खेळवता टायब्रेकरमध्ये जो सर्वात अगोदर 10 गुण मिळवेल तो सेट जिंकेल. पण कमीतकमी 2 गुणांची आघाडी असणे बंधनकारक आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

याबाबत बोलताना फेडरर म्हणाला, खरे सांगायचे झाले तर कोणत्याही बदलांसह खेळण्यास मी तयार आहे. पण या नवीन बदलांमुळे आता मोठे सेट पाहायला मिळणार नाहीत, याची माला खंत आहे. 2016मध्ये महिला विभागात ऑस्ट्रेलियन ओपन जिंकणारी कर्बर म्हणाली, मला शारीरिक क्षमता अजमावणाऱ्या स्पर्धा आवडतात. ऑस्ट्रेलियामध्ये खेळने खूप आव्हानात्मक असते. येथील वातावरण खूप तापलेले असते त्यामुळे नवीन बदलांमुळे सामन्यांचा निकाल कमी वेळेत लागेल. माझ्या खेळावर याचा कसा परिणाम होईल याची मला खात्री नाही. असेही कार्बर म्हणाली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)