महावितरण, गायकवाड इलेव्हन संघाचे विजय

पुणे -फलंदाजांनी उभारलेल्या 170 धावांच्या डोंगरानंतर गोलंदाजांनी केलेल्या टिच्चून माऱ्याच्या जोरावर येथे सुरु असलेल्या पुणे महापौर टी -20 स्पर्धेत महावितरण संघाने सीएनए संघाचा 43 धावांनी पराभव करत स्पर्धेची पुढील फेरी गाठली आहे. तर दुसऱ्या सामन्यात गायकवाड इलेव्हन संघाने ओम क्रिकेट ऍकॅडमीचा 32 धावांनी पराभव करत स्पर्धेत आगेकूच केली.

पहिल्या सामन्यात महावितरण संघाने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 20 षटकात 170 धावांचा डोंगर रचला. यात सलामीवीर नितीन सावरदेकर याने अर्धशतकी खेळी करताना 53 धावा बनविल्या. त्याला चौथ्या क्रमांकावर फलंदाजीस आलेल्या अजय चौहानने 33 धावा बनवत चांगली साथ दिली. नितीन बाद झाल्यावर फलंदाजीस उतरलेल्या रोहित चकोतेने 20 चेंडूत आक्रमक 35 धावांचे खेळी करताना संघाची धावसंख्या 170 पर्यंत वाढवली. प्रत्युत्तरात फलंदाजीस आलेला सीएनए संघ 127 धावांपर्यंतच मजल मारू शकला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

दुसऱ्या सामन्यात गायकवाड इलेव्हन संघाने प्रयाग भाटीच्या 44 धावांच्या जोरावर सर्वबाद 108 धावा बनविल्या. प्रत्युत्तरात ओम क्रिकेट ऍकॅडमी संघाला 76 धावांपर्यंतच मजल मारु शकल्याने त्यांना हा सामना 32 धावांनी गमवावा लागला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)