इवो कार्लोविच, बेनॉय पेर यांची आगेकूच

टाटा ओपन महाराष्ट्र स्पर्धा : भारताच्या साकेत मायनेनीची दुखापतीमुळे स्पर्धेतून माघार

पुणे  – एमएसएलटीए यांच्या तर्फे आयोजित टाटा ओपन महाराष्ट्र स्पर्धेत क्रोएशियाच्या इवो कार्लोविच, इटलीच्या क्वालिफायर सिमॉन बोलेल्ली, फ्रांसच्या बेनॉय पेर या खेळाडूंनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करून दुसऱ्या फेरीत प्रवेश केला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल म्हाळुंगे बालेवाडी येथील टेनिस कोर्टवर सुरू असलेल्या या स्पर्धेत पहिल्या फेरीत भारताच्या पात्रता फेरीतून मुख्य फेरीत प्रवेश केलेल्या भारताच्या साकेत मायनेनीला दुखापतीमुळे माघार घ्यावी लागली. त्यामुळे ब्राझीलच्या थियागो मॉन्टेरोला संधी देण्यात आली. स्पर्धेत फ्रान्सच्या पाचव्या मानांकित बेनॉय पेर याने लकी लुझर ठरलेल्या ब्राझीलच्या थियागो मॉन्टेरोचा 7-6(5), 6-3 असा पराभव करून दुसरी फेरी गाठली.

1 तास 27 मिनिटे चाललेल्या या सामन्यात दोन्ही खेळाडूंनी जोरदार खेळ करत आपापल्या सर्व्हिस राखल्या व त्यामुळे सेट टायब्रेकमध्ये गेला. टायब्रेकमध्ये बेनॉय पेर याने तिसऱ्या गेममध्ये मॉन्टेरोची सर्व्हिस ब्रेक केली व हा सेट 7-6(5)असा जिंकून सामन्यात आघाडी घेतली.

दुसऱ्या सेटमध्ये बेनॉय पेर याने मॉन्टेरोची तिसऱ्या गेमला सर्व्हिस भेदली व सामन्यात 2-1 अशी आघाडी घेतली. त्यानंतर आघाडीवर असलेल्या बेनॉय याने आपले वर्चस्व कायम राखत मॉन्टेरोची नवव्या गेमला सर्व्हिस भेदली हा सेट 6-3अशा फरकाने जिंकून विजय मिळवला.

अन्य लढतीत क्रोएशियाच्या इवो कार्लोविच याने क्वालिफायर कॅनडाच्या फेलिक्‍स ऑगर अलियास्मीवर 6-4, 7-5 असा पराभव केला. हा सामना 1तास 14 मिनिटे चालला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)