झिरो चित्रपटाचे स्पूफ देखील होत आहेत व्हायरल !!

बॉलीवूडचा बादशहा शाहरुख खानच्या चित्रपटांची चाहते खूप प्रतीक्षा करत असतात. त्यातच जर तो काही हटके प्रेक्षकांसमोर आणणार असेल तर प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहचलेली असते. शाहरुखचा बहुचर्चित चित्रपट ‘झिरो’ याचा ट्रेलर प्रेक्षकांना खूपच आवडला.  त्याचे मागील काही चित्रपट मोठा बिजनेस कसू शकले नव्हते त्यामुळे या वर्षाच्या अखेरीस येणाऱ्या या चित्रपटाकडून शाहरुखला देखील खूप अपेक्षा आहेत.

या चित्रपटाचा ट्रेलर  रिलीज झाला तेव्हा पासून तो खूप चर्चिला गेला आहे. यामध्ये सलमान खान देखील पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत असल्याने उत्सुकता आणखी वाढली. चित्रपटाचा ट्रेलर रमजान ईदच्या मुहूर्तावर आला होता. तर सध्या बकरी ईदच्या मुहूर्तावर या चित्रपटाचे स्पूफ देखील खूप व्हायरल होत आहेत. या अगोदर रेस थ्रीचा स्पूफ देखील खूप व्हायरल झाला होता.

झिरो  चित्रपटात शाहरुखसोबत कतरीना कैफ आणि अनुष्का शर्मा देखील मुख्य भूमिकेत आहेत. हा चित्रपट आनंद राय दिग्दर्शित करत असून शाहरुख खानच्या रेड चिलीज एंटरटेन्मेंटच्या माध्यमातून हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख सध्यातरी २१डिसेंबर २०१८ अशी निश्चित आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)