प्रवक्ता रिंगणात; पण…

पक्षांचे प्रवक्‍ते हा पक्षांचा चेहरा असतो. जनमानसात पक्षांविषयीचे मत तयार होण्यामध्ये जे प्रमुख घटक कारणीभूत असतात त्यामध्ये पक्षप्रवक्‍त्यांचाही समावेश असतो. कालांतराने त्यांचीही स्वतःची एक प्रतिमा तयार होत असते. विशेषतः त्यांच्या-त्यांच्या प्रदेशात ते लोकप्रिय होत जातात. साहजिकच पक्ष या लोकप्रियतेचा फायदा घेण्यास उत्सुक असतो. यासाठी त्यांना प्रामुख्याने विधानपरिषदेत आमदारकी किंवा राज्यसभेवर खासदारकी दिली जाते.

शक्‍यतो प्रवक्‍त्यांना थेट निवडणुकीच्या रिंगणात उतरवले गेल्याची फारशी उदाहरणे दिसत नाहीत. महाराष्ट्रातील उदाहरण घेतल्यास पूर्वीच्या काळी भाजपाचे प्रवक्‍ते असणारे प्रकाश जावडेकर, आताच्या काळातील माधव भांडारी, केशव उपाध्ये किंवा कॉंग्रेसमधील सचिन सावंत आदींना थेट रिंगणात उतरवले गेलेले नाही. पण आता भाजपाने आपले राष्ट्रीय प्रवक्‍ते संबित पात्रा यांना पुरी लोकसभा मतदारसंघातून रिंगणात उतरवले आहे. संबित पात्रा हे मधल्या काळात कॉंग्रेस आणि खास करुन राहुल गांधी यांच्यावर केलेल्या टीकेमुळे चांगलेच चर्चेत आलेले आहेत. वास्तविक, पुरीमधून नरेंद्र मोदींना उमेदवारी देण्याचा विचार सुरू होता. पण आता पात्रांच्या नावाची घोषणा झाली आहे. या मतदारसंघातून आतापर्यंत एकदाही भाजपाचा खासदार नाहीये. 1998 पासून या जागेवर बीजू जनता दलाचा कब्जा आहे. 2014 च्या 16 व्या लोकसभेसाठी झालेल्या निवडणुकांत या जागेवरून बीजेडीच्या पिनाकी मिश्रा यांचा विजय झाला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)