संघ निवडीतील फिरकी

भारतीय संघ सध्या सर्वात समतोल संघ आहे. त्यात प्रतिभावान खेळाडूंचा भरणा आहे. परंतु, असे असूनही भारतीय संघाने मोक्‍याच्यावेळी सामने गमावले आहेत. त्याचे मुख्य कारण ठरले होते ते म्हणजे संघ व्यवस्थापनाने निवडलेला चुकीचा संघ. परंतु, ऑस्ट्रेलिया मालिकेच्या सिडनी कसोटीच्या अगोदर भारतीय व्यवस्थापनाने अगोदर आर अश्विन जायबंदी असून तो सिडनी कसोटीला मुकणार असे सांगितले. पण नंतर अवघ्या दोन तासांनी जाहीर केलेल्या संभाव्य संघात अश्विनची निवड करत विरोधी संघाला संभ्रमात टाकण्याची नवी फिरकी घेतली आहे. सिडनीच्या खेळपट्टीचे स्वरुप पाहता भारताने योग्य निर्णय घेतला आहे.

सिडनी मैदानावर सरावानंतर पत्रकार परिषदेमध्ये विराट कोहलीने सांगितले होते की, माझे फिजिओशी बोलणे झाले असुन आर. अश्विन पूर्णपणे तंदुरुस्त नसल्याने तो सिडनी कसोटीला मुकणार आहे. तो खूप महत्त्वाचा खेळाडू असून त्याचे कमतरता आम्हाला जाणवेल. परंतु, हनुमा विहारीने आपली उपयुक्तता सिद्ध केली. त्यामुळे आम्ही अश्विन पूर्णपणे तंदुरुस्त नसताना त्याला मैदानात उतरवण्याचा विचार करत नाही. त्यानंतर दोन तासांनी बीसीसीआयने ट्‌विटरवर भारतीय संभाव्या खेळाडूंची यादी जाहीर केली आणि त्यात आश्विनला स्थान देण्यात आले आहे. अनुभवी इशांत शर्मा दुखापतग्रस्त असल्याने त्याच्याऐवजी उमेश यादवला संधी मिळाली तर फिरकीपटू कुलदीप यादवचाही समावेश करण्यात आला आहे. परंतु, अश्विनला मुख्य संघात स्थान देण्याचा निर्णय सामन्याच्या अगोदर घेण्यात येइल, असेही ट्‌विटमध्ये लिहले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

सिडनीची खेळपट्टी पर्थ आणि मेलबर्नच्या खेळपट्टी सारखी जलदगती गोलंदाजांना पोषक नसून फिरकी गोलंदाजांना पोषक असल्याचे बोलले जात आहे. खेळपट्टीचे क्‍युरेटर जस्टीन ग्रोव्हज यांच्यामते खेळपट्टी चांगली असून गोलंदाज आणि फलंदाज यांना सारखीच मदत मिळणार आहे. पण, ऑस्ट्रेलियाचा कर्णधार टीम पेन खेळपट्टी यजमान देशाला मदत करणारी नसल्याने असमाधानी आहे. त्यामुळे या सामन्यात एक अतिरिक्त फिरकी गोलंदाज घेऊन खेळण्याचा त्यांचा विचार आहे. त्यातच वातावरण चांगले राहणार असल्याने सामन्यावर पावसाचे सावट नाही.

या मालिकेत सर्वात यशस्वी गोलंदाज जसप्रीत बुमराह ठरला असून त्याने सर्वाधिक 20 बळी मिळवले आहे. त्यातनंतर फिरकीपटू नॅथन लायन ने 17 बळी मिळवले आहेत. नॅथन लायनने पहिल्या दोन कसोटीमध्ये 16 बळी मिळवण्याची किमया साधली होती. परंतु,तिसऱ्या सामन्यात त्याला अपेक्षित यश मिळाले नाही. 1991-92 मधील ऑस्ट्रेलिया दौऱ्यात 25 बळी घेत कपिल देवने भारतीय जलदगती गोलंदाज म्हणून सर्वाधिक बळी घेण्याचा विक्रम केला होता. तो विक्रम मोडण्याची संधी जसप्रीत बुमराहकडे आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)