स्पायडरमॅन सापडला! माणसांच्या चेहऱ्याप्रमाणे कोळी तुम्ही पाहिला का?

नवी दिल्ली – सोशल मीडियावर एक व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. या  व्हिडीओ पाहून लोकांमध्ये भीतीचे तसेच कुतूहलाचे वातावरण आहे. हा व्हिडीओ आहे एका कोळीचा.

या व्हिडिओमधील कोळीचा चेहरा माणसांप्रमाणे दिसत आहे. हा कोळी चीनमध्ये सापडला आहे. हा कोळी सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला असून पीपल्स डेली चायनाने (People’s Daily, China ) या व्हिडिओला शेअर केला आहे. या व्हिडीओला पीपल्स डेली चायनाने स्पायडरमॅन सापडला, अशी कॅप्शन दिली. चीनच्या हूनान भागात माणसाच्या चेहऱ्यासारखा कोळी सापडला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत लाखो रिट्विट आणि लाईक्स करण्यात आले आहेत.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)