नीरा नरसिंहपूरच्या विकासकामांना गती

भूमिगत गटारी होणार : विकास आराखड्यानुसार कामे मार्गी

नीरा नरसिंहपूर  – नीरा नरसिंहपूर (ता. इंदापूर) येथील लक्ष्मी नरसिंह देवसंस्थानच्या विकासकामासाठी मिळालेल्या निधीतून कामे मार्गी लागत आहेत. कामाचा दर्जा मजबूत व टिकाऊ असल्याने गावकऱ्यांनी समाधान व्यक्‍त केले आहे. उर्वरित कामे पाच ते सहा महिन्यांत पूर्ण होणार आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

लक्ष्मी नरसिंह देवस्थान हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कुलदैवत आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील भाविक या ठिकाणी दर्शनासाठी येतात. मंदिर व मंदिरासभोवती कामे प्रगतीपथावर असून गावातील भूमिगत गटारीचे काम सुरू आहे. शेजारील भीमा नदी व नीरा नदीवरील पुलाचे काम व भक्‍तनिवासाचे कामात गती आहे. आमदार दत्तात्रय भरणे यांनी विकासकामांसाठी पाठपुरावा केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विकास आराखड्यासाठी निधी देऊन परिसराचा कायापालट केला आहे. भक्‍त निवास व हेलिपॅडही बांधले आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)