स्पेक्‍ट्रम लिलावावरून मोबाइल कंपन्यांतील मतभेद वाढणार 

नवी दिल्ली – 5 जी स्पेक्‍ट्रमच्या लिलावातील कालावधी आणि किमतीवरून वोडाफोन-आयडिया, भारती एअरटेल आणि रिलायन्स जियो इंफोकॉममध्ये मोठे मतभेद असल्याचे समोर आले आहेत. लिलावाची योजना तयार करणाऱ्या दूरसंचार विभागाला यामुळे अडचणी निर्माण झाल्या आहेत. जियोने सर्व उपलब्ध स्पेक्‍ट्रम लिलावाची मागणी केली असून टेलिकॉम
रेग्युलेटरी ऍथॉरिटी ऑफ इंडिया (ट्राई) कडून सूचित केलेल्या किमतीबाबत कोणतीही समस्या नसल्याचे म्हटले आहे. तर

भारती एअरटेलने मार्च 2019 मध्ये संपणाऱ्या आर्थिक वर्षात फक्त 4 जी स्पेक्‍ट्रम लिलावाची मागणी केली आहे.
देशातील सर्वात मोठी दूरसंचार कंपनी वोडाफोन-आयडियाने 2020 पर्यंत कोणतेही लिलाव घेणार नाही तसेच त्यांनी सरकारकडे आत्तापर्यंतच्या दूरसंचार क्षेत्राची स्थिती सुधारण्याबाबत निवेदन दिले आहे. मुकेश अंबानी यांनी 2016 मध्ये जिओची सेवा सुरू केली असल्याने ते स्पेक्‍ट्रमच्या लिलावामध्ये विलंब होऊ देणार नाहीत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)