सरदार पटेल यांच्या पुतळ्यापर्यंत विशेष रेल्वे धावणार

नवी दिल्ली -सरदार वल्लभभाई पटेल यांच्या गुजरातमधील जगातील सर्वांत उंच पुतळ्याचे दर्शन घेता यावे, म्हणून रेल्वे विभागाने 4 मार्चपासून विशेष रेल्वे गाडी सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

या पुतळ्याचे अनावरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले होते. ही रेल्वे केंद्र सरकारच्या भारत दर्शन कार्यक्रमांतर्गत सुरू करण्यात येणार आहे. भारत दर्शन कार्यक्रमांतर्गत 7 दिवस आणि 7 रात्री रेल्वेतून भारतातील विविध धार्मिक व प्रेक्षणीय स्थळांचे पर्यटन करता येते. या पर्यटनात आता उज्जैन व इंदूर येथील महज्योतिर्लिंगे तसेच शिर्डी येथील साईबाबा आणि त्रंबकेश्‍वर व घृष्णेश्‍वर यांच्या दर्शनाचाही समावेश करण्यात आला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

प्रतिव्यक्ती 7 हजार 660 रुपयात हे प्रयर्टन करता येते. जेवणाचीही व्यवस्था रेल्वेच्या वतीने केली जाते. चंदिगड, अंबाला, कुरुक्षेत्र, कर्नाळ, पाणीपत, दिल्ली, रेवारी, अल्वर व जयपूर, अशी स्थानके ही रेल्वे घेते. आता या पर्यटनाचा विस्तार मध्य प्रदेश, गुजरात व मराहाराष्ट्रातही करण्यात आला आहे, अशी माहिती रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)