आगामी “83′ चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त असणाऱ्या रणवीर सिंहने आपल्या चाहत्यांना बर्थ डेनिमित्त खास गिफ्ट दिले आहे. त्याने सोशल मीडिया अकाउंटवर चित्रपटातील आपल्या लुकची पहिली झलक शेअर केली आहे. ज्यात तो भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार कपिल देव यांच्यासारख हुबेहुब दिसतो. या लुकमुळे चाहते खुपच इम्प्रेस झाले असून त्यांनी बर्थ डे बॉयला शुभेच्छा दिल्या आहेत.
आपल्या प्रत्येक भूमिकेला योग्य न्याय देणा-या रणवीरने याही फोटोत जीवापाड प्रयत्न केल्याचे दिसते. कपिल देव सारखी स्टाईलसोबतच त्याचे शानदार एक्सप्रेशनने या लुकला आणखीन परफेक्ट केले आहे. हा लुक शेअर करत तो म्हणतो, माझ्या स्पेशल डेवर सादर आहे, हरियाणाचे तुफान कपिल देव.’ दरम्यान, 1983मधील विश्वचषक स्पर्धेवर आधारित असलेल्या या चित्रपटात रणवीर सिंह कपिल देवची भूमिका साकारत आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत पुन्हा एकदा दीपिका पादुकोण स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. लग्नानंतर प्रथमच हे दोघे एकत्रित झळकणार आहेत.