#विशेष: चीन कडून शिकू काही! (भाग-१)

मोहनदास पै 
चीन हाही भारताप्रमाणेच 1.3 अब्ज अशी प्रचंड लोकसंख्या असलेला देश आहे. भारतासारखीच सामाजिक आणि आर्थिक परिस्थिती असतानासुद्धा चीनने 1950 पासून केलेली प्रगती उल्लेखनीय आहे आणि जगात दबदबाही निर्माण केला आहे. चीनच्या वाटचालीतून आपण बरेच काही शिकू शकतो.
युद्धे आणि राजकीय, सामाजिक उलथापालथीचा मोठा कालखंड अनुभवल्यानंतर भारत आणि चीनने 1950 मध्ये एकाच वेळी प्रगतीच्या दिशेने वाटचाल सुरू केली होती. एकाच वेळी दोन्ही देशांची अर्थव्यवस्था नव्याने वाटचाल करू लागली होती. दोन्ही देश स्वतंत्र होते. एक साम्यवादी विचारप्रणालीचा तर दुसरा लोकशाही.
भारताची परिस्थिती बऱ्याच अंशी व्यवस्थित होती आणि अपेक्षेपेक्षा अधिक प्रगत अर्थव्यवस्था असल्यामुळे आशियातील सर्वांत मोठी अर्थव्यवस्था भारताला लाभली होती. चीनने मोठे फेरबदल आणि क्रांतीचा रस्ता निवडला आणि विध्वंसक सांस्कृतिक क्रांती तसेच “ग्रेट लीप फॉरवर्ड’ संकल्पनेवर आधारित प्रगतीला सुरुवात केली. “ग्रेट लीप फॉरवर्ड’ संकल्पनेत चीनमधील कृषीआधारित अर्थसंकल्पनेकडून औद्योगीकरणाकडे वाटचाल अपेक्षित होती.
1978 मध्ये माओ त्से तुंग यांच्या निधनानंतरच्या काळात चीनची अर्थव्यवस्था अर्थव्यवस्थेच्या ओझ्याखाली दबलेली होती आणि गरिबीशी झुंज देत होती. भारताने आपल्या भांडवलशाही इतिहासाकडे पाठ फिरवून सरकारी नियंत्रणाखालील समाजवादी अर्थव्यवस्था जवळ केली. चीनचा विकासदर सरासरी 3.2 टक्‍क्‍यांच्या दराने तर लोकसंख्या 2.5 टक्के दराने वाढत राहिली, तेव्हा चीनने अवलोकन केले. जपान, जर्मनी आणि भारत वेगाने पुढे जात असल्याचे चीनच्या निदर्शनास आले. सरकारी नियंत्रण, वाढता भ्रष्टाचार आणि नागरिकांमधील वाढता असंतोष या कारणांमुळे चीनची परिस्थिती आणखी खालावत गेली.
1978 मध्ये चीनने परदेशी गुंतवणुकीला आमंत्रण दिले आपल्या किनारी प्रदेशाचे दरवाजे या गुंतवणुकीसाठी खुले केले. शेती सरकारी नियंत्रणातून मुक्त केली. प्राथमिक स्तरापासून सुरुवात करताना चीनने पायाभूत सुविधांमध्ये मोठी गुंतवणूक केली. आज चीन 12.5 खर्व डॉलरसह जगातील दुसरी मोठी अर्थव्यवस्था बनला आहे.
भारताने मात्र आर्थिक संकटानंतर 1991 मध्ये आर्थिक सुधारणा राबवायला सुरुवात केली आणि त्याच वेळी आपली बाजारपेठ मुक्त केली.तेव्हापासून भारताने 8.8 टक्के विकासदर राखून प्रगतीची घोडदौड सुरू केली. भारताच्या अर्थव्यवस्थेचा आकार आज 2.5 खर्व डॉलर एवढा झाला आहे. परंतु आजही भारत चीनच्या तुलनेत खूपच पिछाडीवर आहे. चीनच्या वेगवान प्रगतीतून भारताने कोणता धडा घेतला पाहिजे?
What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)