दुबई पोलीस वापरणार खास हवाई मोटर सायकल

दुबई – दुबई पोलीस खास हवाई मोटर सायकल-हवेत उडणारी मोटर सायकल वापरण्याच्या तयारीत आहेत. अशा हवाई मोटरबाईक वापरण्यासाठी ट्रेनिंग चालू असल्याची माहिती दुबई पोलीस आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे महासंचालक खालिद अन्सारी यांनी दिली आहे.

या हवाई बाईकचे-होवरबाईक “होवरसर्फ-एस3′ असे नाव असून ती हवेत सरळ उंच जाऊ शकते. तिला उड्डाणासाठी रनवे वा काही अंतर धावण्याची आवश्‍यकता नाही. जमिनीवर उतरतानाही ती सरळ जमिनीवर उतरू शकते. सोशल मीडियावर होवरबाईक “होवरसर्फ-एस3 ची चर्चा जोरात चालू आहे. जमिनीपासून 16 फूट उंचीवरून ती उड्डाण करू शकते असे कंपनीने सांगितले आहे.

ज्या ठिकाणी पोलीसांना पोहचणे कठीण असते, अशा दुर्गम ठिकाणी जाण्यासाठी होवरसर्फ-एस3 अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. सध्या दुबई पोलीसांकडे एकच होवरबाईक “होवरसर्फ-एस3 तयार आहे. जर दुबई पोलीसांनी ऑर्डर दिली, तर 40 होवरबाईक “होवरसर्फ-एस3 बनवून देण्याची ओव्हरसर्फ कंपनीची तयारी आहे.

253 किलो वजनाची ही बाईक कार्बन फायबरपासून तयार करण्यात आलेली आहे. हवेत सरळ उड्डाण करता यावे यासाठी तिला 4 रोटर्स लावण्यात आलेले आहेत. ताशी 96 किमी वेगाने उडू शकणारी होवरबाईक “होवरसर्फ-एस3 जास्तीत जास्त सलग 25 मिनिटे उड्डाण करू शकते. बिना पायलट, ड्रोनप्रमाणेही तिचा वापर करता येतो. बिनापायलट ती सलग 40 मिनिटे उड्डाण करू शकते. या होवरबाईक “होवरसर्फ-एस3 ची किंमत 1,5 लाख डॉलर्स (1.8 कोटी रुपये) आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)