ट्रम्प यांचे विशेष अफगाण दूत भारत भेटीवर

वॉशिंग्टन: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे अफगाणिस्तानातील दूत झलमाय खलिलझाद हे प्रथमच भारतभेटवरही येत आहेत. अफगाणिस्तानातील पेच प्रसंगावर तोडगा काढण्याच्या प्रयत्नात ते भारतात आले आहेत. अफगाणिस्तानातील तणावावर तोडगा काढण्याच्या संबंधात अध्यक्ष ट्रम्प यांनी कालच पंतप्रधान मोदी यांच्याशीही फोनवर चर्चा केली होती त्या पार्श्‍वभूमीवर खलिलझाद हे भारत भेटीवर येत आहेत.

अफगाणिस्तान प्रश्‍नावर तोडगा काढण्यासाठी खलिलझाद यांच्या नेतृत्वाखालील अमेरिकेचे शिष्टमंडळ 8 जानेवारी ते 21 जानेवारी या अवधीत भारत, चीन, अफगाणिस्तान, आणि पाकिस्तान या देशांना भेट देणार आहे. अमेरिकेने अफगाणिस्तानातील आपले सैन्य मोठ्या प्रमाणात कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे तेथील परिस्थितीवर शक्‍य तितक्‍या लवकर तोडगा निघावा असा अमेरिकेचा प्रयत्न आहे.


-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)