बिश्केक (किरगीस्तान) – शांघाय सहकार्य संघटनेच्या संरक्षण मंत्र्यांच्या परिषदेच्या निमित्ताने संरक्षण मंत्री निर्मला सितारामन यांनी आज चीनचे संरक्षण मंत्री जनरल वी फेंगे यांच्याबरोबर द्विपक्षीय चर्चा केली. दोन्ही नेत्यांनी प्रादेशिक आणि द्विपक्षीय संरक्षणाच्या मुद्दयांवर चर्चा केली.
सितारामन तीन दिवसांच्या किरगीस्तानच्या दौऱ्यावर असून या दौऱ्यात त्या “शांघाय कोऑप’ संघटनेच्या अन्य देशांच्या संरक्षण मंत्र्यांबरोबर द्विपक्षीय चर्चा करणार आहेत. शांघाय सहकार्य संघटनेच्या संरक्षण मंत्र्यांच्या परिषदेला आजपासून सुरुवात झाली. या परिषदेमध्ये दहशतवादाशी मुकाबला आणि अन्य प्रादेशिक संरक्षण विषयक मुद्दयांवर चर्चा होणार आहे. या वर्षी 14 आणि 15 जूनला होणाऱ्या शांघाय सहकार्य संघटनेच्या परिषदेची पूर्वतयारी संरक्षण मंत्र्यांच्या या परिषदेत होणार आहे.