समझोता एक्सप्रेस निकालावरून खवळलेल्या पाकला भारतीय उच्चायुक्तांचे खडे बोल

समझोता एक्स्प्रेस बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपींची निर्दोष मुक्तता केल्याने पाकिस्तानने आज भारतीय उच्चायुक्तांना समन्स बजावले होते. पाकिस्तानने भारतीय उच्चायुक्तांना निमंत्रित करून निषेध नोंदविला असता भारताचे पाकिस्तान उच्चायुक्त अजय बिसरीया यांनी पाकिस्तानला भारतावर झालेल्या २६/११ दहशतवादी हल्ल्याच्या तपासावरून आणि जैश-ए-मोहम्मद सहित इतर दहशतवादी संघटनांबाबत पाकिस्तानच्या ढिसाळ धोरणावरून चांगलेच धारेवर धरले.

तत्पूर्वी आज सकाळी बारा वर्षांपूर्वी झालेल्या समझोता एक्स्प्रेस बाँबस्फोटप्रकरणी पंचकुलाच्या एका विशेष ( NIA ) न्यायालयाने याबाबत निर्णय देताना स्वामी असीमानंद, लोकेश शर्मा, कमल चौहान आणि राजिंदर चौधरी यांची निर्दोष मुक्तता केली होती.

पाकिस्तानने भारतीय उच्चायुक्त अजय बिसरीया यांना याबाबत निषेध नोंदविण्यासाठी निमंत्रित केले असता बिसरीया यांनी पाकिस्तानचे लक्ष भारताची आर्थिक राजधानी मुंबई येथे झालेल्या २६/११च्या दहशतवादी हल्ल्यांकडे खेचले. याबाबत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बिसरीया यांनी पाकिस्तानला २६/११ प्रकरणी तपासाचे चक्र जलदगतीने फिरवण्यास सांगितले. तसेच यावेळी त्यांनी पाकिस्तानला जैश सहित अन्य दहशतवादी संघटनांवर देखील कारवाई करण्याची विनंती केली.

https://twitter.com/ANI/status/1108401647754067969

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)