हाॅकी विश्वचषक स्पर्धा 2018 : स्पेन-फ्रान्स सामना बरोबरीत

भुवनेश्वर – येथील कलिंगा स्टेडियममधील मैदानावर सोमवारी झालेल्या स्पेन वि फ्रान्स यांच्यातील सामना 1-1 ने बरोबरीत सुटला. त्यामुळे दोन्ही संघाना समान गुण देण्यात आले.

जागतिक क्रमवारी पाहता स्पेनचा संघ 8 व्या स्थानावर तर फ्रान्सचा संघ हा 20 व्या स्थानावर आहे. त्यामुळे कालच्या सामन्यात स्पेनचे पारडे जड मानले जात होते.

-Ads-

कर्णधार आणि गोलकीपर क्विको काॅर्टीसने फ्रान्सचा जबरदस्त पेनल्टी स्ट्रोक आपल्या कौशल्याने रोखत हाॅकी विश्वचषक स्पर्धेत आपल्या स्पेन संघावरील पराभवाची नामुष्की टाळली. सामन्यात फ्रान्सकडून 6 व्या मिनिटाला टिमोथी क्लेमेंटने पहिला व एकमेव गोल नोंदवला. तर स्पेनकडून अल्वारो इगलेसिसने 48 व्या मिनिटाला गोल करत सामन्यात बरोबरी साधली.

स्पेन हा ग्रुप ए मध्ये 1 गुणासह तिसऱ्या आणि फ्रान्स हा 1 गुणासह ग्रुपमध्ये चौथ्या स्थानावर आहे. ग्रुप ए मध्ये अर्जेंटिनाचा संघ 6 गुणासह टाॅपवर तर न्यूझीलंडचा संघ 3 गुणासह दुसऱ्या स्थानावर आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)