अखेर ‘बुआ-भतीजा’ एकत्र; लोकसभा निवडणुकीसाठी सपा व बसपाची आघाडी

लखनऊ – आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उत्तरप्रदेशमध्ये समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्षाने आघाडी केली आहे. आज सपाचे अध्यक्ष अखिलेश यादव आणि बसपाच्या अध्यक्षा मायावती यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत ही घोषणा केली. यासोबतच भाजपवर टीकास्त्र सोडले.

उत्तरप्रदेशात एकूण ८० जागा आहेत. समाजवादी पक्ष आणि बसपा ३८-३८ अशा जागेच्या फॉर्म्युलानुसार निवडणूक लढवणार आहेत. तर अमेठी आणि रायबरेली या जागा काँग्रेससाठी सोडण्यात आल्या आहेत. याशिवाय अन्य दोन जागा मित्रपक्षांना देण्यात येणार आहेत. अन्य छोट्या पक्षांशी चर्चा सुरु असल्याचे सांगण्यात आले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

काँग्रेस-भाजपवर हल्ला चढवित मायावती म्हणाल्या कि, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शहा यांची झोप उडविणारी ही पत्रकार परिषद ठरेल. काँग्रेसच्या काळात घोषित आणीबाणी होती तर भाजपच्या काळात अघोषित आणीबाणी आहे. भाजप आणि काँग्रेसची अवस्था एकसारखीच असून दोन्ही सरकारच्या काळात घोटाळे झाले. काँग्रेसला बोफोर्स घोटाळ्यामुळे सत्ता गमावली.  तर भाजपला राफेल घोटाळ्यामुळे सत्ता गमवावी लागणार आहे, असा दावा त्यांनी केला आहे.

यावेळी अखिलेश यादव यांनीही भाजपवर सडकून टीका केली. भाजप नेते मायवतींवर आक्षेपार्ह शब्दात टीका करतात.  त्यांच्यावर कोणतीही कारवाई होत नाही. आता मायावतींचा सन्मान माझा सन्मान आणि त्यांचा अपमान माझा अपमान आहे, असे त्यांनी सांगितले. पंतप्रधान पदासाठी मायावतींना पाठिंबा देणार का? या प्रश्नाला उत्तर देताना अखिलेश यादव म्हणाले कि, आम्ही कोणाला पाठिंबा देणार हे सर्वानाच माहिती आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)