होय सोरायसिस बरा होऊ शकतो! भाग २ (आजार कसा आटोक्‍यात ठेवाल?)

डॉ. जयदीप महाजन
दर वर्षी ऑगस्ट महिना हा जागतिक पातळीवर सोरायसिस जनजागृती महिना म्हणून साजरा केला जातो. सोरायसिस हा संसर्गजन्य आजार नाही, पण या आजारात त्वचेवर निर्माण होणारे चट्टे रुग्णांच्या भावनांवर, वागणुकीवर परिणाम करतात. अशा वेळी सकारात्मकवृत्तीनं या आजारावर उपचार घेतल्यास नक्की बरं होता येतं. फक्त संयम आणि काळजी महत्त्वाची असते. 
काय केले पाहिजे? 
साधारणपणे असा समज आहे की, हा त्वचारोग चुकीच्या खाण्यापिण्यामुळे होतो; परंतु सोरायसिस हा प्रकार जास्त वा कमी खाण्यामुळे किंवा जीवनसत्त्वांच्या अभावामुळे होत नाही. तरीही पथ्य पाळाले तर चांगलंच आहे. म्हणजे औषधाची मात्रा लवकर लागू पडते.
आहारात मिठाचा वापर बेतानंच करावा
कारल्याच्या रसात एक चमचा लिंबाचा रस मिसळून प्यावा
जेवणात गाजराचा कीस, कोबी, काकडीपासून बनवलेले पदार्थ असावेत. हे पदार्थ स्वच्छ धुवून कच्चे खाल्ल्यास काहीच हरकत नाही
शहाळ्याचं पाणी प्यावं
बीट, भोपळ्यापासून बनवलेले पदार्थ खावेत
मोड आलेल्या कडधान्यांपासून बनवलेल्या पदार्थाचा आहारात समावेश असावा चहा, कॉफी, तंबाखू, दारूचं व्यसन सोडावं
आजार कसा आटोक्‍यात ठेवाल?
सोरायसिसची उपचार पद्धती, हा सर्वात दुर्लक्षित भाग आहे. रुग्णाच्या सहकार्याशिवाय ती व्यवस्थितपणे पूर्ण होत नाही आणि पर्यायानं आजार पूर्णपणे बरा होत नाही. त्यासाठी पुढील पथ्य पाळणं गरजेचं आहे.
मानसिक ताणतणाव कमी करणं. त्यासाठी योगासनं, प्राणायाम हे प्रकार खूप फायदेशीर ठरू शकतात.
दारू, सिगारेट आणि तंबाखूच्या व्यसनांपासून स्वत:ची सुटका करून घ्या.
ज्या-ज्या ठिकाणी त्वचेला इजा पोहोचते, तिथे सोरायसिसचा आजार असण्याची वा आधी होऊन गेलेला असल्यास तो पुन्हा उद्‌भवण्याची शक्‍यता असते. त्यामुळे छोट्या-मोठ्या जखमांपासून सावध राहा.
सुती, मऊ आणि सैलसर कपडे वापरा.
सर्वसाधारणपणे अल्कली गुणधर्म जास्त नसणाऱ्या सौम्य साबणांचा वापर करावा. तसंच आंघोळीच्या आधी तेल किंवा तत्सम स्निग्ध पदार्थ आवर्जून लावावेत.
तज्ज्ञ डॉक्‍टरांच्या सल्ल्याशिवाय कुठलीही बाहेरची औषधं स्वत:च्या मनानं घेऊ अथवा वापरू नका.
डॉक्‍टरांनी सांगितलेल्या औषधांचा वापर अचानकपणे स्वत:च्या मनानं बंदही करू नका.
थोडक्‍यात काय तर थोडं संयमानं, सकारात्मक वृत्तीनं घेतल्यास या आजारावर नक्की मात करता येईल. शेवटी आत्मविश्‍वास महत्त्वाचा!

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)