हिवाळ्यात सोयरायसिसचे व्यवस्थापन 

डॉ. शहनाझ अर्सीवाला

हिवाळा ऋतूमध्ये त्वचेची काळजी घेणे आवश्‍यक आहे, खास करून सोरायसिस आजाराने पीडित लोकांनी विशेष काळजी घेतली पाहिजे. थंड व कोरड्या वातावरणामुळे रूग्णांना वारंवार व प्रखर फ्लेअर-अप्सचा सामना करावा लागतो.
सोरायसिसला बरेचदा केवळ त्वचेची किंवा सौंदर्यविषयक समस्या समजले जाते पण हा एक ऑटो-इम्युन विकार आहे. अर्थात वेळेत लक्षात आल्यास त्याचे प्रभावी व्यवस्थापन होऊ शकते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

सोरायसिसची सामान्यपणे आढळणारी लक्षणे म्हणजे चंदेरीसर पापुद्रयांखाली झाकली गेलेली लालसर, खाज सुटणारी त्वचा, फिकट पडलेली नखे आणि डोक्‍याच्या त्वचेवरून कोंड्याप्रमाणे सुटणारे पांढरट पापुद्रे. सोरायसिसच्या रुग्णांना अधून-मधून ही लक्षणे अजिबात जाणवत नाहीत. मात्र, बराच काळ कोणत्याही लक्षणांशिवाय गेल्यानंतर अचानक लक्षणे उसळी घेऊ शकतात याकडे रुग्णांनी लक्ष दिले पाहिजे.

सोरायसिसचा त्रास हिवाळ्यात का वाढतो ?                                                                                 हिवाळ्यातील थंड आणि कोरड्या वातावरणामुळे त्वचेत पुरेशी आर्द्रता उरत नाही. सोरायसिसच्या रुग्णांची त्वचा आधीच शुष्क असते. त्यात आर्द्रता कमी झाल्यामुळे लक्षणे अधिक तीव्र होतात. शिवाय, हिवाळ्यात सूर्यप्रकाश कमी मिळत असल्याने शरीरातील जीवनसत्वाची पातळी लक्षणीयरित्या खालावते (हे जीवनसत्व त्वचा सूर्यप्रकाशाला प्रतिसाद देत तयार करते) सोरायसिसच्या बहुतेक रुग्णांमध्ये ड जीवनसत्वाची कमतरता असते आणि याचे प्रमाण हिवाळ्यात वाढते. त्वचेच्या पेशींच्या वाढीमध्ये तसेच प्रतिकार यंत्रणेच्या नियमनात ड जीवनसत्व महत्त्वाची भूमिका बजावत असते. त्यामुळे सोरायसिसची लक्षणे हिवाळ्यात वाढणे साहजिक आहे.

हिवाळ्यात सोरायसिसचे व्यवस्थापन कसे करता येईल? 

मॉइश्‍चरायझिंग किंवा बॉडी वॉशचा वापर 
साबणातील रसायने त्वचेचे नैसर्गिक पीएच कमी करू शकते, ज्यामुळे त्वचेची जळजळ होऊ शकते. न्यूट्रल पीएच स्तर असलेला साबण किंवा बॉडी वॉशचा वापर केल्याने त्वचेतील ओलावा कायम राहतो आणि त्वचा कोरडी होत नाही. बॉडी वॉशचा वापर करताना लोफहचा वापर करणे टाळा, कारण यामुळे त्वचेला अधिक जळजळ होऊ शकते.

ओटमील बाथ 
ओटमील बाथमध्ये आंघोळ करणे आल्हाददायी अनुभव देऊ शकते आणि सोयरासिसच्या कोरड्या, लालसर, खाज आणणा-या स्केल्सना दूर करण्यामध्ये मदत करू शकते. ओट्‌स पाण्याच्या संपर्कात आल्यानंतर जिलेटिनस फिल्म निर्माण होते, जी त्वचेचे संरक्षण करण्यासोबतच त्वचेला ओलावा देते. फक्‍त पाणी उबदार असल्याची खात्री घ्या. त्वचेला घासणे किंवा खाजवणे टाळा, यामुळे त्वचेची अधिक जळजळ होऊ शकते आणि फ्लेअर-अप्स देखील होऊ शकते. 6

स्किन क्रीम /मॉइश्‍चरायझरचा वापर 
दिवसभर त्वचेमधील ओलावा टिकवून ठेवा. दिवसातून किमान दोन वेळा त्वचेवर क्रीम किंवा मॉइश्‍चरायझर लावा (विशेषत: त्वचा ओलसर असताना).

कपडे 
लोकरीच्या कपड्यांमुळे त्वचेची जळजळ वाढण्यासोबतच फ्लेअर-अप्समध्ये देखील वाढ होऊ शकते. हिवाळ्यादरम्यान सोयरासिस रुग्णांनी लोकरीच्या कपड्यांच्या आत सुती कपडे परिधान करावे. यामुळे त्यांना फ्लेअर-अप्सबाबत अधिक चिंता करण्याची गरज भासणार नाही आणि थंडीपासून देखील त्यांचे संरक्षण होईल.

सूर्यप्रकाशात उभे राहा
हिवाळ्यादरम्यान योग्य प्रमाणात सूर्यप्रकाश न मिळल्यास कोणीही खिन्न होऊ शकतो. अधिकाधिक सूर्यप्रकाश मिळवण्याचा प्रयत्न करा आणि बाहेर वेळ व्यतित करा. सूर्यप्रकाशातून तुम्हाला जीवनसत्तव ड मिळण्यासोबतच तुमचा उत्साह देखील वाढेल.

जीवनशैलीमध्ये हे सर्व बदल करण्यासोबतच उपचार पथ्यांचे पालन करण्यास आणि डर्माटोलॉजिस्टने सांगितल्याप्रमाणे औषधे घेण्यास विसरू नका. हिवाळा ऋतूमध्ये सोयरासिस रूग्णांनी नियमितपणे डॉक्‍टरांना भेटून सल्ला घेतला पाहिजे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)