साऊथच्या ‘या’ सुपरस्टारने खरेदी केली कोटींची ‘व्हॅनिटी व्हॅन’

हैद्राबाद – साऊथ सुपरस्टार व अनेक तरुणींच्या गळ्यातील ताईत असणाऱ्या सिनेअभिनेता अल्लू अर्जूनने तब्बल 7 कोटींची व्हॅनिटी व्हॅन खरेदी केली आहे. यामुळे अल्लू अर्जून पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. अनेक लक्झरी फिचर्स असणाऱ्या या कारचे एक्सटीरीअर पाहिले तर त्यावर अल्लूने ‘AA’ असं स्वत: चं नाव कोरून घेतलं आहे.


ही व्हॅनिटी व्हॅन बेंज चौसीवर तयार केलेली आहे. अमिताभ बच्चन, सलमान खान आणि शाहरूख खान यापैकी कुणाकडेही अशी अलिशान गाडी नाहीये. त्यामुळे अल्लू अर्जून हा एवढी महाग व्हॅनिटी खरेदी करणारा पहिला अभिनेता ठरला आहे. दाक्षिणात्य चित्रपटांतून प्रसिद्धीच्या झोतात असणारा अल्लू आता मात्र त्याच्या या शानदार व्हॅनिटी व्हॅनमुळे चाहत्यांच्या आकर्षणाचं केंद्र बिंदू ठरला आहे.

 

View this post on Instagram

 

It’s Sexy & I Love it 🖤 #AAFALCON

A post shared by Allu Arjun (@alluarjunonline) on

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)