मार्क हुजेस यांचा प्रशिक्षक पदावरून पायउतार

साऊथहॅम्पटन – साऊथ हॅम्पटन फुटबॉल संघाचे प्रशिक्षक मार्क हुजेस यांना त्यांच्या पदावरून पायउतार करण्यात आले आहे. मॅंचेस्टर उनीट्रेड विरुद्धचा सामना 2-2 असा बरोबरीत राहिल्यानंतर या क्‍लबच्या व्यवस्थापनाने हा निर्णय घेतला. साऊथहॅम्पटनचा संघ मागील 10 सामान्यांपासून विजयाच्या प्रतीक्षेत होता. त्यात युनाइटेड विरुद्धच्या सामन्यात त्यांनी प्रथम 2-0 अशी आघाडी घेतली आणि विजयाची आशा निर्माण झाल्या. परंतु त्यानंतर युनिटेडने 2 गोल करत सामना 2-2 असा बरोबरीत सोडवला.

साऊथहॅम्पटन क्‍लबकडून सांगण्यात आले की, आम्ही क्‍लबचे मुख्य प्रशिक्षक मार्क हुजेस यांना प्रशिक्षक पदावरून पायउतार करतो आहोत. यानंतर माहिती मैलाले की, साऊथहॅम्पटन संघाचे मुख्य सहायक प्रशिक्षक एडील नीलविकी आणि संघाचे सहायक व्यवस्थापक मार्क बॉवेन यांनी देखील क्‍लबपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे.

यंदाच्या मोसमात इंग्लीश प्रीमियर लीगमध्ये साऊथहॅम्पटनचा संघ 14 सामन्यात 1 विजय 7 पराभव आणि 6 सामने बरोबरीत सोडवत 9 गुणांसह 18व्या स्थानावर आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)