फुटबॉल स्पर्धा : पेटिट स्कूल, बिशप्स कल्याणीनगर, स्प्रिंग डेल स्कूल ब संघांचा उपान्त्यपूर्व फेरीत प्रवेश 

ग्रीनबॉक्‍स 12 वर्षांखालील आंतरशालेय फुटबॉल स्पर्धा 
पुणे: जे. एन. पेटिट स्कूल अ आणि ब, तसेच बिशप्स कल्याणीनगर व स्प्रिंग डेल स्कूल ब या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करून ग्रीनबॉक्‍स 12 वर्षांखालील आंतरशालेय फुटबॉल स्पर्धेच्या उपान्त्यपूर्व फेरीत प्रवेश केला. ग्रीनबॉक्‍स यांच्यातर्फे ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
कॅस्टल रॉयल, एबीआयएल कॅम्पस, रेंजहिल्स, भोसलेनगर येथील फुटबॉल मैदानावर सुरु असलेल्या या स्पर्धेतील उपउपान्त्यपूर्व फेरीच्या लढतीत कौशल भांडारकरच्या दोन गोलच्या जोरावर जे. एन. पेटिट स्कूल ब संघाने इंदिरा नॅशनल स्कूल संघाचा 4-2 असा पराभव करताना उपान्त्यपूर्व फेरीत प्रवेश केला.
उपउपान्त्यपूर्व फेरीच्य दुसऱ्या लढतीत जयेश उमरधनच्या हॅटट्रिक कामगिरीच्या जोरावर जे. एन. पेटिट स्कूल अ संघाने एचईएम गुरुकुल संघावर 5-1 असा एकतर्फी विजय मिळवला. तर तिसऱ्या उपउपान्त्यपूर्व सामन्यात अस्मय गायकवाडच्या हॅटट्रिकच्या बळावर स्प्रिंग डेल स्कूल ब संघाने सिम्बायोसिस इंटरनॅशनल स्कूल संघाचा 3-1 असा पराभव केला.
आणखी एका सामन्यात अगस्त्य पाटणकरच्या दमदार हॅटट्रिक कामगिरीच्या जोरावर बिशप्स कल्याणीनगर संघाने दस्तूर हायस्कूल संघाचा 10-0 असा दणदणीत पराभव करत उपान्त्यपूर्व फेरीत प्रवेश केला. ओरायन मॅथ्यू, वेदांत शंकर यांनी प्रत्येकी दोन तर एकलव्य ब्राह्मनीय व शौर्य चव्हाण यांनी प्रत्येकी एक गोल करून बिशप्स कल्याणीनगर संघाला मोठा विजय मिळवून दिला.
सविस्तर निकाल-
उपउपान्त्यपूर्व फेरी –
जे एन पेटिट स्कूल ब – 4 (कौशल भांडारकर 3 व 16वे मि., यशधन वाडिया 14 मि, फरझन सेठना 22वे मि) वि.वि. इंदिरा नॅशनल स्कूल-2 (आरव साबळे 13वे मि, निहार कुचनकर 19वे मि), जे एन पेटिट स्कूल अ -5 (रोहन उत्तेकर 4 मि, प्रतीक गायकवाड 9वे मि , जयेश उमरधन 18, 20 व 23वे मि) वि.वि. एचईएम गुरुकुल स्कूल – 1 (श्रेय किशोरे 22 मि), बिशप्स स्कूल कल्याणीनगर- 10 (अगस्त्य पाटणकर 2, 4 व 6वे मि, जसवीर सिंग 7वे मि, ओरायन मॅथ्यू 8 व 10वे मि, वेदांत शंकर 11 व 13वे मि, एकलव्य ब्राह्मनीय 15 मि, शौर्य चव्हाण 18वे मि) वि.वि. दस्तूर हायस्कूल- 0, स्प्रिंग डेल स्कूल ब-3 (अस्मय गायकवाड 3, 8 व 18वे मि ) वि.वि सिम्बायोसिस इंटरनॅशनल स्कूल – 1 (शेरीयर माझदा 20वे मि).

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)