दक्षिण आफ्रिकेच्या ‘एल्बी माॅर्केल’चा क्रिकेटला अलविदा

जोहान्सबर्ग –  दक्षिण आफ्रिकेचा अष्टपैलू खेळाडू एल्बी माॅर्केलने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. क्रिकेटमधील आपली वीस वर्षाची कारर्कीद थांबविण्याचा आणि सर्व प्रकारच्या क्रिकेट प्रकाराला अलविदा करण्याचा निर्णय माॅर्केलने जाहीर केला.

एल्बी माॅर्केलने 2004 साली दक्षिण आफ्रिकेच्या एकदिवसीय संघातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. माॅर्केल याने दक्षिण आफ्रिकेसाठी 58 एकदिवसीय, 50 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. तर माॅर्केल आपल्या  कारर्किदीत  संघासाठी केवळ एकच कसोटी सामना खेळू शकला आहे. कसोटी क्रिकेटमध्ये त्यांच्या नावावर 59 धावा आणि 1 विकेट आहे. एकदिवसीय सामन्यात माॅर्केलने 782 धावा आणि 50 विकेट घेतलेल्या आहेत तर टी20 क्रिकेटमध्ये 572 धावा आणि 26 विकेट त्याचा नावावर आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

37 वर्षीय एल्बी माॅर्केलला भारतात खरी ओळख आणि प्रसिध्दी मिळाली ती आयपीएलमुळे. तो आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्स संघाचा सदस्य होता.  2008 आणि 2013 साली तो चेन्नईचा विजयी संघाचा भाग होता. त्यानंतर त्याला राॅयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि दिल्ली डेअरडेव्हिलसमध्येही संधी मिळाली. त्याने आयपीएलमध्ये एकूण 91 सामने खेळले असून त्यामध्ये 974 धावा आणि 82 विकेटस मिळवल्या आहेत.

माॅर्केलने प्रथम श्रेणीमध्ये टाइंटस संघाचे कर्णधारपदसुध्दा भूषविले आहे. त्याच्या नेतृत्वाखाली संघाने अनेक विजय मिळविले आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)