साऊदॅम्प्टन – 12व्या विश्वचषक स्पर्धेतील आपल्या अभियानाची सुरूवात भारतीय संघ आज दक्षिण आफ्रिके विरुद्धच्या सामन्याद्वारे करणार असुन पहिल्याच सामन्यात विजय मिळवत सकारात्मक सुरूवात करण्यास भारतीय संघ उत्सूक आहे. तर, स्पर्धेतील लागोपाठ तिसरा पराभव टाळण्याचे आव्हान दक्षिण आफ्रिकेच्या संघासमोर असणार आहे.
तत्पूर्वी झालेला नाणेफेकीचा कौल हा दक्षिण आफ्रिकेच्या बाजूने लागला आहे. दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार फाफ ड्यु प्लेसिस याने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे.
Toss news from the Hampshire Bowl!
Faf du Plessis wins the toss and South Africa will bat first.#SAvIND LIVE 🔽 https://t.co/yx6Mkqsy3J pic.twitter.com/RZXnBCsOsF
— ICC Cricket World Cup (@cricketworldcup) June 5, 2019
दरम्यान, भारतीय संघात उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट फलंदाज आणि उत्कृष्ट अष्टपैलू खेळाडूंचा भरणा आहे. त्यातच संघातील महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या मधल्या फळीतील फलंदाजांना विश्वचषक स्पर्धेपुर्वीच लय गवसली असल्याने भारतीय संघ समतोल आणि बलाढ्य झाला आहे. तर, दुसरीकडे दक्षिण आफ्रिकेच्या संघाला यंदाच्या स्पर्धेत आपले पहिले दोन्ही सामने गमवावे लागल्याने त्यांचा संघ चांगलाच दबावात सापडलेला असुन त्यांच्यावरील दबावाचा फायदा भारतीय संघ कशा प्रकारे उचलतो हे पहाणे महत्वाचे ठरणार आहे.