#SAvPAK : दक्षिण आफ्रिकेचा पाकवर विजय, मालिकेत 2-0 ने आघाडी

केपटाऊन – दक्षिण आफ्रिका आणि पाकिस्तान यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यात डेल स्टेन आणि कगिसो रबाडा यांच्या प्रभावी गोलंदाजीच्या बळावर आफ्रिकेने पाकिस्तानचा 9 गडी राखून पराभव केला आहे. पाकिस्तानचा हा सलग दुसरा पराभव ठरला. मालिकेतील एक कसोटी सामना अजून बाकी असला तरी तीन कसोटी सामन्याच्या मालिकेत आजच्या विजयासह दक्षिण आफ्रिकेने 2-0 ने आघाडी घेत मालिकाही आपल्या खिशात टाकली आहे.

दरम्यान, दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने पहिल्या डावात सर्वबाद 177 धावा केल्या. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेने पहिल्या डावात सर्वबाद 431 धावा करत 254 धावांची आघाडी घेतली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

प्रत्युत्तरात पाकिस्तानचा संघ दुसऱ्या डावात सर्वबाद 294 धावांपर्यतच मजल मारू शकला. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी 43 धावांचे आव्हान मिळाले. विजयासाठी 43 धावांचे आव्हान दक्षिण आफ्रिकेने 1 गडी गमावत सहज पार केले आणि मालिकेतील दुसरा विजय आपल्या नावावर केला.

दक्षिण आफ्रिकेकडून पहिल्या डावात फलंदाजीमध्ये फाफ डु प्लेसीने सर्वाधिक 103 धावा केल्या. तर सामन्यात गोलंदाजीत पहिल्या आणि दुसऱ्या डावात मिळून डेल स्टेनने एकूण 7,  कगिसो रबाडाने 6, डुएन ओलिवरने 5 आणि वेरनाॅन फिलेंडरने 2 गडी बाद केले. फाफ डू प्लेसी हा सामनावीर ठरला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)