#SAvPAK : तिसऱ्या विजयासह दक्षिण आफ्रिकेचा कसोटी मालिकेवर ‘3-0’ ने कब्जा

जोहान्सबर्ग – दक्षिण आफ्रिकेने मालिकेतील तिसऱ्या आणि अखेरच्या कसोटी सामन्यात पाकिस्तानचा 107 धावांनी पराभव केला आहे. या विजयासह दक्षिण आफ्रिकेने तीन कसोटी क्रिकेट सामन्यांची मालिका 3-0 ने जिंकत निर्भेळ यश मिळविले.

दक्षिण आफ्रिकेने तिसऱ्या कसोटीत पाकिस्तान संघास विजयासाठी 381 धावांचे आव्हान दिले होेते. मात्र दक्षिण आफ्रिकेच्या भेदक गोलंदाजीसमोर पाकिस्तानचा संघ 273 धावांवर आटोपला, आणि आफ्रिकेने पाकिस्तानवर 107 धावांनी विजय संपादित केला.

दुसऱ्या डावात पाकिस्तानकडून असद शफीफने सर्वाधिक 65 धावा तर शादाब खानने 47, शान मसूदने 37, इमाम-उल-हकने 35 धावा केल्या. तर दुसऱ्या डावात दक्षिण आफ्रिकेकडून कगिसो रबाडा आणि डुएन ओलिवरने प्रत्येकी 3 गडी बाद केले. तर डेल स्टेनने 2 आणि वेरनाॅन फिलेंडरने 1 गडी बाद केला.

दक्षिण आफ्रिकेचा क्विंटन डी काॅक हा सामनावीर तर डुएन ओलिवर हा मालिकावीर ठरला.

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)