#SAvPAK : क्विंटन डि काॅकची तूफानी खेळी, दक्षिण आफ्रिकेचा 3-2 ने मालिका विजय

न्यूलैन्ड्स (दक्षिण आफ्रिका) – यष्टीरक्षक क्विंटन डि काॅकच्या 83 धावांच्या खेळीच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेने पाचव्या आणि निर्णायक एकदिवसीय सामन्यात पाकिस्तानचा 7 गडी राखून पराभव केला. या विजयासह दक्षिण आफ्रिकेने पाच एकदिवसीय सामन्यांची क्रिकेट मालिका 3-2 ने आपल्या नावे केली आहे.

दरम्यान दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकांत 8 बाद 240 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेने 40 षटकांतच 3 बाद 241 धावा करत विजय संपादित केला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

दक्षिण आफ्रिका संघाकडून क्विंटन डी काॅकने शानदार खेळी केली. त्याने 58 चेंडूत 83 धावा (11 चौकार, 3 षटकार) केल्या. फाफ डू प्लेसीने नाबाद 50 आणि रैसी वैन डर डुसेन यानेही नाबाद 50 धावांची खेळी करत संघाला विजय मिळवून दिला.

पाकिस्तानच्या इमाम-उल-हा याला मालिकावीरांचा किताब देण्यात आला तर क्विंटन डी काॅकला सामनावीर म्हणून गौरविण्यात आले.

https://twitter.com/OfficialCSA/status/1090682370448068608

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)