दक्षिण आफ्रिकेचा आॅस्ट्रेलियावर ‘2-1’ ने मालिका विजय

होबार्ट – डेव्हिड मिलरच्या 139 व फाफ ड्युप्लेसिसच्या 125 धावांच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेने आॅस्ट्रेलियाचा 40 धावांनी पराभव करीत तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत 2-1 असा विजय संपादन केला.

प्रथम फलंदाजी करताना मिलर व ड्युप्लेसिस यांनी केलेल्या 252 धावांच्या भागीदारीच्या जोरांवर दक्षिण आफ्रिकेने तिसऱ्या व निर्णायक सामन्यात 5 बाद 320 धावसंख्या उभारली. विजयासाठी 321 धावांचा पाठलाग करताना आॅस्ट्रेलियाचा संघ 50 षटकांत 9 बाद 280 धावसंख्याच करू शकला. त्यामुळे आॅस्ट्रेलियन संघाला 40 धावांनी पराभव स्विकारावा लागला.

-Ads-

आॅस्ट्रेलियन संघाकडून शाॅन  माॅर्श याने 106 धावा केल्या, पण आपल्या संघास विजय मिळवून देण्यास तो अपयशी ठरला. आफ्रिकेच्या गोलंदाजापैकी डेल स्टेनने 3, कगिसो रबाडाने 3 तर लुंगी एनगिडी आणि इमरान ताहिरने प्रत्येकी 1 गडी बाद केला.

डेव्हिड मिलरने  108 चेंडूत 13 चौकार आणि 4 षटकारासह 139 धावा करत दक्षिण आफ्रिकेच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. डेव्हिड मिलर याला सामनावीर म्हणून गौरविण्यात आले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)