साऊथदॅम्प्टन – हाशिम आमला, क्विंटन डी कॉक, फाफ ड्यु प्लेसिस, डेव्हिड मिलर यासारखे तगडे फलंदाज संघात असुनही केवळ खराब प्रदर्शनामुळे स्पर्धेतील तिनही सामने गमावलेल्या दक्षिण आफ्रिकेसमोर आज वेस्ट इंडिजचे कडवे आव्हान असणार आहे. आजच्या सामन्यात विजय मिळवून विश्वचषक स्पर्धेतील आपले आव्हान कायम राखण्यास दक्षिण आफ्रिकेचा संघ प्रयत्नशील आहे.
विश्वचषकातील दक्षिण आफ्रिका विरूध्द वेस्टइंडिज यांच्यातील सामन्यास साऊथदॅम्प्टन येथील द रोझ बोऊल मैदानावर सुरूवात झाली असून पावसामुळे खेळ थांबविण्यात आला आहे. पावसामुळे खेळ थाबंला तेव्हा दक्षिण आफ्रिकेच्या 7.3 षटकांत 2 बाद 29 धावा झालेल्या आहेत.
Down comes the rain.
With South Africa 29/2, the players unfortunately go off the field.
FOLLOW LIVE ⬇️ | #CWC19https://t.co/vaVqYG8omh pic.twitter.com/RxVGYucpHG
— ICC Cricket World Cup (@cricketworldcup) June 10, 2019
सलामीवीर हाशिम अमला 6 तर एडेन मारक्रम हा 5 धावांवर बाद झाले आहेत. तर सध्या खेळपट्टीवर क्विंटन डिकॉक 17 आणि कर्णधार फाफ डु प्लेसिस शून्यावर खेळत आहेत. वेस्ट इंडिजकडून गोलंदाजीत शेल्डन काॅटरेल याने 4 षटकांत 18 धावा देत 2 गडी बाद केले आहेत.
Sheldon Cottrell whips out his salute in just his second over!
Amla fends one straight to Gayle at slip and South Africa lose an early wicket.
FOLLOW LIVE ⬇️ | #CWC19https://t.co/vaVqYG8omh pic.twitter.com/DpRGECPyC6
— ICC Cricket World Cup (@cricketworldcup) June 10, 2019
दरम्याान, अजूनही मैदानावर पाऊस चालूच आहे. पावसामुळे खेळ थांबल्याने दोन्ही देशातील क्रिकेट चाहत्यामध्ये चांगलीच नाराजी दिसून येत असली तरी अजूनही प्रेक्षक ‘पाऊस थांबून खेळ सुरू होईल’, याची प्रतिक्षा करीत स्टेडियममध्ये बसून आहेत.
The facial expressions in this photo sum up the current mood at the Hampshire Bowl.
It's still raining ☔ 🌧️ pic.twitter.com/wOA3j6YmzM
— ICC Cricket World Cup (@cricketworldcup) June 10, 2019