#AUSvSA : दक्षिण आफ्रिकेचा आॅस्ट्रेलियावर 6 गडी राखून विजय

पर्थ : आॅस्ट्रेलिया वि. दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिल्या एकदिवसीय सामन्यात आफ्रिकेने बाजी मारली. दक्षिण आफ्रिकेने आॅस्ट्रेलियावर 6 गडी राखून विजय मिळविला आहे. या विजयासह आफ्रिकेने तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.

दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना आॅस्ट्रेलियाच्या संघाने 38.1 षटंकात सर्वबाद 152 धावा केल्या होत्या. विजयासाठी 153 धावांचे आव्हान आफ्रिकेने 4 गडी गमावत 29.2 षटकांत पूर्ण केले.

आफ्रिकेच्या संघाकडून फलंदाजीत क्विंटन डी काॅकने 47, रीजा हेंड्रिक्सने 44 आणि एेडेन मारक्रम याने 36 धावा केल्या. गोलंदाजीमध्ये एन्डिले फेहलुकवेअोने 3 तर डेल स्टेन, लुंगी एनगिडी, इमरान ताहिर यांनी अाॅस्ट्रेलियन संघाचे प्रत्येकी 2 गडी बाद केले.

आफ्रिकेच्या डेल स्टेनने 7 षटकांत 18 धावा देत 2 गडी बाद केले. सामन्यातील सर्वोत्तम कामगिरीमुळे डेल स्टेन याला सामनावीराचा किताब देऊन गौरविण्यात आले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)