लंडन – विश्वचषक स्पर्धेत शनिवारी दक्षिण आफ्रिका आणि अफगाणिस्तान यांच्यात झालेल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने अफगाणिस्तानवर 9 गडी राखून विजय मिळविला आहे. त्यामुळे विश्वचषक स्पर्धेत पाच सामने खेळणाऱ्या दक्षिण आफ्रिकेचा हा पहिलाच विजय ठरला आहे.
Finished with a six – South Africa secure their first win of #CWC19 in style!
Imran Tahir set up the victory with four wickets before Quinton de Kock's brisk 68 and a century opening stand sealed the deal against Afghanistan.
Is their campaign back on track?#ProteaFire pic.twitter.com/VAB0mf04Ih
— ICC (@ICC) June 15, 2019
नाणेफेक जिंकून दक्षिण आफ्रिकेने प्रथम गोलंदाजी स्विकारली होती. आफ्रिकेच्या भेदक गोलंदाजीसमोर प्रथम फलंदाजी करणारा आफगाणिस्तानचा संघ 34.1 षटकांत सर्वबाद 125 धावा करू शकला. आफ्रिकेकडून गोलंदाजीत क्रिस माॅरीसने 3 तर इमरान ताहिरने सर्वाधिक 4 गडी बाद केले.
प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेने अवघा एक गडी गमावत 131 धावा करून निर्विवाद विजय मिळविला. दक्षिण आफ्रिकेकडून हाशिम आमलाने नाबाद 41 तर अँडिले फेहलूकवायोने नाबाद 17 धावा केल्या. क्विंटन डी कॉकने 68 धावा केल्या.
WICKET!
The captain strikes – #GulbadinNaib dismisses Quinton de Kock for 68.
FOLLOW #SAvAFG ▶️ https://t.co/1Pwa3jahvz#ProteaFire#AfghanAtalan pic.twitter.com/YEKdgs5eww
— Cricket World Cup (@cricketworldcup) June 15, 2019