दिल्ली कॅपिटल्सच्या सल्लागारपदी सौरव गांगुली

संग्रहित छायाचित्र...

नवी दिल्ली – इंडियन प्रीमिअर लीग अर्थात आयपीएलचा 12वा हंगाम सुरू होण्यासाठी काही दिवसच शिल्लक राहिले आहेत. यावेळी दिल्ली कॅपिटल्स (दिल्ली डेअरडेव्हिल्स) संघाने नव्याने संघबांधणी केली असून ते मातब्बरांना धक्का देण्यासाठी सज्ज आहेत. त्यांच्या या निर्धाराला भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीचे पाठबळ मिळणार असून सौरव गांगुलीची दिल्ली कॅपिटल्स संघाच्या सल्लागारपदी निवड करण्यात आली आहे.

सौरव गांगुलीहा आयपीएलच्या आगामी हंगामात ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉटिंगसह दिल्लीला मार्गदर्शन करणार आहे. पॉटिंग दिल्लीचा प्रशिक्षक आहे. यावेळी नोलताना सौरव गांगुलीने आपली प्रतिक्रीया व्यक्त केली असून दिल्ली कॅपिटल्ससह काम करण्यास उत्सुक आहे. जिंदाल आणि जेएसडब्ल्यु समुहाला अनेक वर्षांपासून मी ओळखतो. त्यामुळे त्यांच्या संघासोबत काम करताना आनंद मिळेल.

गत हंगामात दिल्लीला तळाच्या स्थानावर समाधान मानावे लागले होते. आतापर्यंत दिल्लीची कामगिरी समाधानकारक झालेली नाही. त्यांना चारवेळा तळाच्या स्थानावर समाधान मानावे लागले तर केवळ दोनदाच त्यांनी प्ले ऑफमध्ये प्रवेश केला. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या दिल्ली संघाला पहिल्याच सामन्यात माजी विजेत्या मुंबई इंडियन्सचा सामना करावा लागणार आहे. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर 26 मार्चला हा सामना होणार आहे. त्यानंतर घरच्या मैदानावर ते गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्सशी भिडतील.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)