सोपोर चकमकीत दोन दहशतवाद्याचा खात्मा

श्रीनगर: काश्‍मीरमधील सोपोर येथे सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये आज झालेल्या चकमकीत दोन दहशतवाद्याला कंठस्नान घालण्यात आले आहे. या चकमकीच्या पार्श्वभूमीवर परिसरातील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे.
बारामुल्ला जिल्ह्यातील सोपोरमधील वारपोरा येथे दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती. गुरुवारी रात्रीपासून या भागात शोधमोहीम राबवली जात होती. अखेर पहाटे सुरक्षा दलांनी दोन दहशतवाद्यांना घेरले. यानंतर सुरु झालेल्या चकमकीत दोन्ही दहशतवाद्याला कंठस्नान घालण्यात आले.

चकमकीच्या पार्श्वभूमीवर परिसरातील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. तसेच स्थानिकांकडून चकमकीदरम्यान होणारा विरोध टाळण्यासाठी परिसरात गुरुवारी रात्रीपासूनच जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)