‘या’ हटके अंदाजात सोनू सूदने पूर्ण केला #BottleCapChallenge

मुंबई – सध्याच्या सोशल मीडियावर #BottleCapChallenge चॅलेंजेसची क्रेझ मोठ्या प्रमाणात चालू आहे. हॉलिवूड स्टार इरोलसन ह्युज याने या चॅलेंजची सुरुवात केली असून, त्यापाठोपाठ अभिनेता अक्षय कुमार, टायगर श्रॉफ, विद्युत जामवाल, कुणाल खेमु आदींनी हे चॅलेंज पूर्ण केले आहे. या सर्वांनी चॅलेंजचे व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

 

View this post on Instagram

 

🍼 🧢 💪 #bottlecapchallenge

A post shared by Sonu Sood (@sonu_sood) on

दरम्यान, अभिनेता ‘सोनू सूद’ याने देखील हे चॅलेंज स्वीकारले असून, त्याने सुद्धा आपला व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये सोनू सूद दांड्याला पकडून हवेत चालण्याची अॅक्टिंग करतो आणि बाटलीचे झाकण उडवत चॅलेंज पूर्ण करत आहे. त्याचा हा व्हिडीओ चाहत्यांच्या चांगलाच पसंतीला उतरल्याचे दिसत आहे. हा व्हिडीओ शेअर करताना सोनूने ‘#bottlecapchalleng’ असे लिहिले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)