सोनिया गांधींनी नितीन गडकरींवर उधळली स्तुती सुमने !

नवी दिल्ली: लोकसभेत आज जोरदार चर्चा रंगली ती सोनिया गांधींच्या भाषणाची कारण सोनिया गांधींनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यावर चांगलीच स्तुती सुमने उधळली. आणि बेंच वाजवून जोरदार समर्थन दिले. लोकसभेत आज नितीन गडकरी प्रश्न उत्तरांच्या तासात भारतमाला परियोजना, दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवे आणि चारधाम प्रकल्पासंदर्भांत प्रश्नांना उत्तरे देत होते.

भाजप, शिवसेना, काँग्रेस आणि इत्तर पक्ष्याच्या सदस्यांनी राजमार्ग आणि पायाभूत सुविधा च्या क्षेत्रात झालेल्या कामांमुळे गडकरींची स्तुती केली. गडकरी म्हणाले, ‘माझ्यासाठी हे विशेष असून मी खुप भाग्यवान आहे. कारण विरोधी पक्षांचे खासदार देखील माझ्या कामामुळे समाधानी आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

नितीन गडकरी जलसंधार आणि गंगा संरक्षण मंत्रालयाचा प्रभार सुद्धा सांभाळत आहेत. उत्तराखंड मधील चार धाम जोडण्यासाठी राबवलेल्या प्रकल्पा संदर्भात उत्तर देताना त्यांनी गंगा नदीचे उदाहरण देत. प्रयागमध्ये पहिल्यांदा गंगा स्वच्छ असल्याचे सांगितले. दरम्यान लोकसभा अध्यक्ष्य महाजन यांनी गडकरींना आशीर्वाद दिले.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)