#WWCHs2018 : सोनिया चहल अंतिम फेरीत दाखल

नवी दिल्ली – जागतिक महिला अंजिक्यपद बाॅक्सिंग स्पर्धेमध्ये भारताच्या सुवर्णपदकाच्या आशा दोनवर पोहचल्या आहेत. माजी विश्वविजेत्या मेरी कोम हिच्या पाठोपाठ आता भारताच्या सोनिया चहलनेही शुक्रवारी या स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.

सोनियाने उपांत्यफेरीत 57 किलो वजनी गटात उत्तर कोरियाच्या जो साॅन हिचा 5-0 ने पराभव करत अंतिम फेरीत धडक मारली आहे. त्यामुळे भारताला आता दोन सुवर्णपदक पटकाविण्याची संधी आहे. भारताने आतापर्यत या स्पर्धेत दोन कांस्यपदके पटकावली आहेत.

शनिवारी 4 वाजता सोनिया हिची अंतिम फेरीत 57 किलो वजनी गट प्रकारात कजाखिस्तानच्या बाॅक्सिंगपटू विरूध्द सुवर्णपदकासाठी लढत होणार आहे. तर दुसरीकडे भारताची आघाडीची बाॅक्सिंगपटू मेरी कोम हिचा सुध्दा शनिवारी 4 वाजता 48 किलो वजनी गटात अंतिम लढतीचा सामना होणार आहे. मेरी कोम हिचा सामना युक्रेनच्या हेना अोखोता विरूध्द होणार आहे. अंतिम लढतीचा सामना हा दिल्ली येथील इंदिरा गांधी स्टेडियमध्ये शनिवारी 4 वाजता सुरू होणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)