#WWCHs2018 : भारतीय बाॅक्सिंगपटू सोनिया चहल हिचे रौप्यपदकावर समाधान

नवी दिल्ली – जागतिक महिला अंजिक्यपद बाॅक्सिंग स्पर्धेमध्ये भारताची आघाडीची बाॅक्सिंगपटू मेरी कोम हिने सुवर्णपदक पटकावले आहे. त्यापाठोपाठ भारताची बाॅक्सिंगपटू सोनिया चहल हिला जागतिक महिला अंजिक्यपद बाॅक्सिंग स्पर्धेतील 57 किलो वजनी गटातील अंतिम फेरीत जर्मनीच्या आर्नेल वाहनर हिच्याकडून पराभव स्विकारावा लागला आहे. त्यामुळे भारतीय बाॅक्सिंगपटू सोनिया चहल हिला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले आहे.

-Ads-

तत्पूर्वी दुसरीकडे जागतिक महिला अंजिक्यपद बाॅक्सिंग स्पर्धेमध्ये 48 किलो वजनी गटात अंतिम फेरीत मेरी कोमने युक्रेनच्या हेना अोखोता हिचा 5-0 ने पराभव करत सुवर्णपदक पटकावले आहे.

जागतिक महिला अंजिक्यपद बाॅक्सिंग स्पर्धेत  भारताने आता या स्पर्धेत एकूण चार पदके पटकावले आहेत. यामध्ये एक सुवर्ण, एक रौप्य आणि दोन कांस्यपदकाचा समावेश आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)